Thursday, June 27, 2024

कविता प्रकाशित

आज दिनांक 23 जुन 2024 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " आत्मविश्वास " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .

गोष्ट माणसाची

जो तो इथे घाईत
आहे कुणाकडे वेळ ।
अहोरात्र काबाड कष्ट
बसेना कशाचा मेळ।
उरलीच कुठे सवड आता
जीवनच झाले खेळ ।

भूक साठी चाले सारे
उठते पोटात कळ ।
सुख समाधान हरवले
करतो नुसती पळापळ ।
खणायचे ते कुठे काय
गवसेल का आता तळ ।
Sanjay R.


Thursday, June 20, 2024

छंद लागला

लागला का छंद मज
कळेना असते कुठे मन ।
आठवणीत तुझ्याच का
जाईना एकही क्षण ।

कधी नजर आकाशात
नी मोजतो एकेक तारा ।

वाटावं कुणालाही बघून
आताच बरसतील धारा ।


तहान भूक हरतो सारे
नसते शुद्ध कशाचीच  ।
आभास होतात सारखे
खेळ चालतो मनाशीच ।

मधेच हसतो मनात
कधी होतो मी गंभीर ।
लागेना मन कशात
कधी होते ते अधीर ।
Sanjay R.


गैर समज

समज वा नासमज
सगळाच गैर समज ।
समजवायचे किती
असो वा नसो गरज ।

तुटलेले हे मन असे
जुळेल का खरंच ।
धाग्याला धागा जुळतो
स्वच्छ असे मन तरच ।

नको राग नको लोभ
मोह माया ठेवा दूरच ।
मनाशी मन जुळवा
मी मी सोडाल तरच ।
Sanjay R.




Wednesday, June 19, 2024

अधीर हे मन

अधीर किती हे मन
थांबेना एकही क्षण ।
सदा आस कशाची
अनमोल कुठले धन ।
Sanjay R.