Thursday, November 10, 2022

जीव गुंतला

गुंतला जीव माझा तुझ्यात
सांगतो आहे काय मनात
भास होतात सदा तुझेच
रमेना हे मन आता कशात
Sanjay R.


झेलू किती प्रहार

झेलू किती मी प्रहार
होतात किती वार ।
इकडे बघू की तिकडे
आहेत दिशा इथे चार ।
असह्य होते सारेच
सहन होईना मार ।
जड झाले सारे
उचलू कसा मी भार ।
जिकण्याचा विचार दूर
करतो स्वीकार हार ।
Sanjay R.


आसपास

कुठला भास कशाचे आभास
नाही काहीच तर खास ।
तुलाही नको मलाही नको
आता कशाचा त्रास ।
दोन वाटा या वेगळ्या
तुटू दे सारेच विश्वास ।
तरीही सांगतो मी
असेल मन माझे आसपास ।
Sanjay R.


एक कोरे पान

नजरेपुढे माझ्या
एक कोरे पान ।
नव्हते शब्द त्यावर
पण होत्या भावना ।
कितीतरी वेळ असाच
होतो मी बघत ।
निघायचे तिथून
मनच नव्हते करत ।
अगोदरच मिटवले होते
त्यातले शब्द पट ।
बाजूलाच होते पडलेले
नवे कोरे कागद ।
परत लिहायला
नवीन मनोगत ।
कुणास ठाऊक
भरतील की नाही ।
कळेना काही
की जातील वाऱ्यासह उडत ।
आता सुचत नाही कविता
त्या कथेचा ही अंत ।
पण मनाला वाटत
वाहत राहावी ती धार
अगदी शांत आणि संथ ।
Sanjay R.


Monday, November 7, 2022

आभास

कशाला हवेत आभास ।
होईल मग त्रास
हवे ते घडते कुठे
होतो सगळा विनाश ।
शांततेने जगायचे
खायचे दोन घास ।
जायचे सगळे सोडून
संपेल जेव्हा श्वास ।
Sanjay R.