Friday, September 30, 2022

फक्त पुढे जायचे

जायचे पुढेच पुढे
नाही साथ कुणाची ।
क्षितिजा च्या पलीकडे
जाते वाट ही आयुष्याची ।

दगड धोंडे मढेच येती
पार करायच्या अडचणी ।
झेलायचे घाव सारेच
जखमा होतील क्षणोक्षणी ।

माघारीचा नाही रस्ता
फक्त पुढे चालायचे ।
एक दिवस होईल संध्या
तोवर आपण जगायचे ।
Sanjay R.


अनंत यात्रा

एकट्याचीच ही यात्रा
कोण असतो सोबतीला ।
जन्मदाती ती आई
पुरते कुठे जन्मला ।

जन्मभर मग चाले फेरा
सह प्रवासी भेटे वाटेला ।
जुना सुटतो नवा जुळतो
थांम्बतो कोण जीवनाला ।

नाती गोती सारी मिथ्या
असतो कोण शेवटाला ।
चार जण देतात सोडून
जातो एकटाच अंताला ।
Sanjay R.


भटकंती

एकट्याने कुठे जायचे
कामानिमित्त निघायचे ।
काम सम्पताच मग
टाईमपास भटकायचे ।
ठरले नसते काहीच
रस्ता नेईल तिकडे जायचे ।
पाय थकले की थांबायचे
करून थोडा पोटोबा
परत मग निघायचे ।
भटकण्यात जातो वेळ
अनुभव गाठी बांधायचे ।
Sanjay R.


मुखवटा

बघू नको हे खोटे हास्य
त्यामागे आहेत आसवं ।
खोटा मुखवटा मिरवतो
आहे इथे सारंच फसवं ।
Sanjay R.


Monday, September 26, 2022

फाटका पसारा

दुःख बघायला जरा
गरीबा घरी जावे ।
दुखातही हसतो तो
त्याच्या संसारास बघावे ।

दुःखाचे घेऊन ओझे
जगतो रोजचा दिवस ।
घरात नसतो दाना
करेल कशाचा नवस ।

कुणी असतो आजारी
सदा असतो कर्जबाजारी ।
औषध डॉक्टर कुठे
नसतो मदतीला शेजारी ।

रोज तिथे उपवास
संथ चालतात श्वास ।
चार भाग होतात
असेल जर एक घास ।

अंगात फाटक्या चिंध्या
त्यावर निघतो आज ।
तेच तर उरले आता
बाळगू कुणाची लाज ।

डोक्यावर कुठले छत
येतो ऊन पाऊस वारा ।
ठिगळ लावून सरले
उरला फटका पसारा ।
Sanjay R.