Tuesday, June 29, 2021

" वादळ "

वाटा जरी ओळखीच्या
येते कधीही वादळ
वाऱ्यासोबत होते मग
माणसांची पळापळ ।
उडवून नेतो सारेच
माजते नुसती खळबळ ।
होतो वारा शांत आणि
उरते फक्त हळहळ ।
Sanjay R.


" आला पाऊस आला "

अष्टाक्षरी

" ओला सुगंध मातीचा "

गेले आभाळ झाकुनी
भासे प्रहर रातीचा ।
वाहे वादळी वारा तो
जसा निधड्या छातीचा ।

कुठे पडली वीज ती
झाला प्रकाश वातीचा ।
सरी सूटल्या नभात
भिजे देह धरतीचा ।

धरा झाली ओली चिंब
पडे पाऊस प्रीतीचा ।
नाही फुलला मोगरा
ओला सुगंध मातीचा ।

बळी राजा सुखावला
आहे तोच हिमतीचा ।
साथ नको सोडू आता
भार झेलतो शेतीचा ।

स्वप्न बघतो डोळ्यात
शेतकरी तो जातीचा ।
सज्ज तो जाहला द्याया
नारा हरित क्रांतीचा ।
Sanjay R.


Monday, June 28, 2021

" कुठे उरेल क्षण "

वेळच पडतो अपुरा
कुठे उरेल क्षण ।
ढीग हवा साऱ्यांना
पुरेल कसा कण ।

मुंगीचे असते बरे
वेचते एकेक कण ।
तरीही कसा तो
भरतो किती मण ।


आमची हावच भारी
नको कण कण ।
नितीच उरली कुठे
पडतो मग घण ।

काही तर असे इथे
पछाडतील सारे रण ।
मिळत नाही काहीच
उपाशी होतो सण ।

विचारांचा सारा घोळ
मी सांगिल तू म्हण ।
माणुसकीच नाही
विचारू नका गण ।
Sanjay R.




Sunday, June 27, 2021

" ओला गंध मातीचा "

वर्णू किती मी माझ्या देशा
ओला गधं या मातीचा.....

झेललेत वार किती तू
गर्व मज निधड्या छातीचा...

किती किती मी नावे घेऊ
देश अमुचा गांधींचा .......

थोर इथले संत महात्मे
संदेश दिला तो शांतीचा....

राम असो वा कृष्ण असो
गर्व आम्हा मानव जातीचा...

जगतो मरतो कष्ट करुनी
सम्मान आम्हा बळी राजाचा...

विश्वास नाही अजून सरला
करतो आदर जीवनाचा....

नमन करतो या भूमातेला
जयजयकार या देशाचा....
Sanjay R.


" प्रीतीच्या वाटेवर "

शब्दातली जादू तुझ्या
तार मनातले छेडते ।

शोधतो तयात मी
का प्रित अशीच जडते ।

भावनांचा मेळ हाच 
मन मनास जोडते ।

प्रीतिच्या या वाटेवरती
काय असे ते घडते ।

दुखातही आपोआप
अश्रू नायनातून ढळते ।
Sanjay R.