Friday, June 19, 2020

" संपणार नाही प्रवास "

जीवन माणसाचे
आहे हा प्रवास ।
मनात उठती तयात
किती किती ते ध्यास ।

पळापळी चाले सारी
असती सारे प्रयास ।
हाप लागते धाप लागते
येतो फुलून श्वास ।

वाटे अर्धवट सारे
लागेल कसा कयास ।
दूर दिसती आपुले
निव्वळ सारेच आभास ।

सारे भुकेने व्याकुळ
सुटतो मुखतला घास ।
किती हा लोभ मनाला
नाही संपत हव्यास ।
Sanjay R.

Thursday, June 18, 2020

" राजकुमार "

सदा चाले डोक्यात 
विचारांवरती विचार ।
येयील एक राजकुमार 
होऊन घोड्यावरती स्वार
जाईल घेऊन दूर देशी
जन्माचा तो जोडीदार ।
करील जो प्रेम अपार 
देई आयुष्याला आधार ।
काय स्वप्नांचा तो सार
आनंदी मनाचा विचार ।
प्रत्येकीच्या मनातले
व्हावे स्वप्न हे साकार ।
Sanjay R.

Wednesday, June 17, 2020

" जप चाले मनी "


देवा का रे हा असा
तुझ्या माझ्यात दुरावा ।
भक्तीला तुझ्या का
हवा रे तुज पुरावा ।

नित्य करिती भक्त
भक्ती तुझीच देवा ।
नाही कुठली अपेक्षा
हवा भक्तीचा ठेवा ।

चरणी तुझ्या असू दे
भाव भक्तीचा माझ्या ।
दर्शनाची मनात आशा
येईल पंढरीत तुझ्या ।

दुमदुमू  दे परत पंढरी
भक्त भुकेला तुझा हरी ।
नामस्मरण तुझेच चाले
डोळे तुझ्या वाटेवरी ।

घोष विठ्ठलाचा कानी
निघे ओठातून ध्वनी ।
जय हरी विठ्ठल विठ्ठल 
जप अखंड चाले मनी ।
Sanjay R.


Tuesday, June 16, 2020

" बंधन हे प्रेमाचे "

बंधन प्रेमाचे वाटे 
मज हवे हवे ।
मनात फुलती मग
आनंदाचे थवे ।

मनात तू स्वप्नात तू
विचार तुझाच चाले ।
एकांतात मी जेव्हा
शब्द तुझ्याशीच बोले ।

आठवणींचा तो सागर
मन लाटांवर झुले ।
गगनात येते फिरून
निळे आकाश खुले ।

नजरानजर होई जेव्हा
मन आनंदाने डुले ।
दरवळ सुगन्धचा देई
मनी मोगऱ्याची फुले ।
Sanjay R.

Monday, June 15, 2020

" मोबाईलवर चाले गप्पा "

हातात आले मोबाईल
हा जीवनाचा टप्पा 
रंगताहेत आता खूप
त्यावरच गप्पा ।

पूर्वी मन मोकळं करायला
नव्हता कुठला पर्याय ।
समोरा समोर भेट व्हायची
सहजच वळायचे पाय ।

दिवस महिने वर्ष आता
कळतच नाही किती गेले ।
मोबाईलवरच होते भेट
सारे व्हर्चुअल आता झाले ।

जीवन झाले किती व्यस्त
आता वेळच नाही पुरत ।
मोबाईल वर करायच्या गप्पा
बसायचं कशाला झुरत ।
Sanjay R.