Thursday, April 16, 2020

" लॉक डाऊन "

दूर झालेत सारे
वळणावर कुठल्या मी आलो ।

देणे घेणे आपलेच आता
स्वयंसिद्ध कसा मी झालो ।

नव्हता वेळ कशाला
भेटलो असतो शेवटी मरणाला ।

ठेविले कोरोना तू घरात
कळले महत्व घराचे या जीवनाला ।

नाते गोते सारे कळले
स्थैर्य लाभले विचाराला ।
Sanjay R.


" वात्सल्य "

" वात्सल्य "

वात्सल्य ही तर 
जीवनाची धुरा ।
आई असें त्यात 
वात्सल्याचा झरा ।

आई विना सांगा 
कोण इथे खरा ।
जीवन मृत्यू तर
आयुष्याचा फेरा ।

आई विना पोर
विचारच नको जरा ।
प्रेम वात्सल्या विना
वाटे अर्थहीन ही धरा ।
Sanjay R.

Wednesday, April 15, 2020

" सहज मनात आलं "

नैसर्गिक ऊर्जेचे प्रमूख तीन स्रोत आहे प्रकाश , वायू  आणि जल
या तिन्ही स्त्रोतांची उपलब्धता अगदी मुबलक प्रमाणात आणि निशुल्क स्वरूपात आहे .
आजही आपण या तीन स्रोतांचा वापर आपल्या जीवनात करून घेऊन काही अंशी ऊर्जेची गरज भागवत आहोत पण तरीही ही ऊर्जा कितीतरी पटीने रोज वाया पण जात आहे, याचा पूर्ण पणे आपण उपयोगच करत नाही , आणि खनिज संपदा आणि पैसा लावून आपण इतर प्रकारांनी ऊर्जा मिळवून ती वापरात घेत आहोत. हे खरंच आपलेच दुर्दैव्य आहे.
या दृष्टीने संशोधने ही खूप झालीत, अजूनही चालू आहेत, पण ती तितकीशी पुरेशी नाहीत, आज शाळा कॉलेज मध्ये मुलांना त्या दृष्टीने शिक्षण देऊन त्यांची वैचारिक शक्ती जर वाढविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळायला वेळ लागणार नाही आणि आपल्याकडे तशी प्रयत्न करणारी एक सहा शोधकांची पूर्ण टीम तयार होईल
शासनाने त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करायला हवेत 
पूर्वी हे नैसर्गिक उपाय वापरून केलेले प्रयोग म्हणजे, सूर्य चूल, सोलर वॉटर हिटर, पान चक्की, पवन चक्की,सोलर पावर , हायड्रो पावर, विंड पावर, इत्यादी अनेक प्रकारे आपण प्रयत्न केलेत.यात यशही लाभले, पण अजून संशोधनाची गरज आहे 
त्यातून नक्कीच यशोगाथा लिहिली जाऊ शकते, 
धन्यवाद
संजय रोंघे
नागपूर

Tuesday, April 14, 2020

" बाहुली "

उठताच सकाळी
व्हायचे लाड तिचे सुरू ।
आंघोळ, तेल कंगवा
पावडर गंध म्हणायची
मी काय काय करू ।

लाडकीच होती ती
बाहुली गोरी पान ।
नकटे नाक, गोबरे गाल
दिसायला होती छान ।

चाले सोबत जेवण
सोबत तिचाही आराम ।
मैत्रीण जिवाभावाची
खेळायचे एवढेच काम ।

हळूहळू दिवस लोटलेत
मी झाली मोठी नि ती लहान ।
कधीतरी साथ सुटली आणि
गेले अडगळीत तिचे ध्यान ।

आठवणी मात्र अजूनही आहेत
माझीच ती बाहुली ।
बालपणीची सखी तीच
होती माझी सावली ।
Sanjay R.





Monday, April 13, 2020

" मुख गालात हसते "

मनात जे वसते
डोळ्यात ते दिसते
नाते काय असते
अंतरात ते बसते 
भाव मुखास कळते
मुख गालात हसते 
Sanjay R.