Friday, July 20, 2018

" प्यार ही प्यार "

बात है कुछ पहलेकी

दिन  हुवे हो दो चार ।


उमडा था दिलमे 

यूही मेरा प्यार ।


देखकर उनको

दिलमे हुई बहार ।


हसता चेहरा भोली सुरत

गाल गुलाबी जैसे अनार ।


सुंदरसी चमकीली आखे

ओठ शराबी गलेमे हार ।


जी कहेता रहा

कैसे करू मै दिदार ।


झोका हवाका आये

और तूट जाये दिवार ।


उलझन मी था दिल

किससे करू तकरार ।


कह दे वह कुछ भी

ना करू इनकार ।


करू मै उनसे

बस प्यार ही प्यार ।


बुझा दो बुझा दो

अब दिलमे लगी अंगार ।

Sanjay R.


Thursday, July 19, 2018

" माह्या वऱ्हाडाची माती "

म्हाया वऱ्हाडाची माती 

फुलवते सारी नाती गोती ।


धनी राबतो थे शेती

होतो वला पावसाच्या घाती ।


पऱ्हाटीले फुटते पाती

वळे कष्टाच्या वाती ।


तवा येयी पयसा हाती

पोसे मानसाच्या जाती ।


घास दोन सारे खाती

कधी उपासाच्या राती ।


तुटे निसर्गाची गती

हाती ढेकलाची माती ।


दिस हपत्याचे साती

जीव उरफाटा घेती ।


अभंग तुकोबाचा गाती

फुले इंच इंच छाती ।


सपन उद्याचे पाहती 

झोप सुखाची राती ।

Sanjay R.


" काय किती भारी "

काय किती भारी
जमात आमची सारी ।
पेलतायेत सगळे
आपापली जवाबदारी ।

गडबड गोंधळ घोटाळे
चाललंय दारोदारी ।
उघडा वर्तमान पात्र
दिसेल नुसती मारामारी ।

संपल्यातच जमा आहे
आता दुनिया दारी ।
पैज लागलं नुसती
कोण कुणावर भारी ।

राजकारणात दिसताहेत
गिधाडं आणी घारी ।
भोग भोगले आम्ही
आता आली तुमची बारी ।

जागोजागी वाळवळतात
हेच नाग विषारी ।
वाजवा कुणी आता
युद्धाची तुतारी ।

रे विठ्ठला फुलली कशी
माणसांनी पांढरी ।
माणुसकीचा दे प्रसाद
होईल सफल जन्माची वारी ।
Sanjay R.



Saturday, July 14, 2018

" माझे मलाच कळेना "

का कुणास ठाऊक
माझे मलाच कळेना
बंध माझ्या मनाचे
मनाशीच जुळेना

कधी आकाशात नजर
वाजे अंतरात गजर
जीव होई अधर
वाटे नाही कुणालाच कदर

कधी मारायच्या खेपा
वाढवायच्या जागीच धापा
वाटे भीती मग
मनच मनावर टाकील का छापा

सहजच मग मनात
चमचमले एक किरण
जोश उत्साह आनंदात
झाले दुःखाचे हरण
Sanjay R.

Thursday, July 12, 2018

" कसं जायचं बाहेर "

सांग ना गं आई
कसं जायचं बाहेर ।
पावसाचे असावे कां
इथेच कुठे माहेर  ।

दहा दिवस झालेत
त्याच्या पाहुणचाराला ।
अजून किती मुक्काम
कोण जाईल विचारायला ।

शाळा नाही खेळ नाही
लागलो मित्रांना विसरायला ।
मूडच नाही लागत माझा
आता अभ्यासाला बसायला ।

ये ये म्हटलं तर
इतका का रे येतो ।
सांगत हि नाही
कधी तू जातो ।

जा म्हणा आता
परत तू येशील ।
थोडं दिवस आम्हा
उसंत तर देशील  ।

काकांच्या शेतात छान
पुन्हा तू पडशील ।
वीसरु नको बाबा नाहीतर
जाऊन कुठे दडशील ।
Sanjay R.