Monday, November 20, 2017

" आखोकी नमी "

पाहिले मनात जे स्वप्न मी
क्या थी कुछ उसमे कमी ।
निरभ्र झाले आकाश सारे
राह देखती अब यह जमीं ।
ये परतुनी उणीव आहे तुझी
मीटा दे अब आखोकी नमी ।
सुन्या सुन्या या विश्वात माझ्या
ना कर और मुझे तु जख्मी ।
Sanjay R.

Saturday, November 18, 2017

" झाली राधा धरा "

पहाटेचा गार वारा
परतला शुक्र तारा ।
फुलवला सुर्याने
तांबडा लाल पिसारा ।

वाजे दुर घंटा नाद
वाहे श्रद्धेचा झरा ।
बासरीच्या सुरात
झाली राधा धरा ।
Sanjay R.

Wednesday, November 15, 2017

" कपसाला का नाही भाव "

काय सांगु राव
नाही कापसाला भाव ।
निवडणुकी आधी
किती मारला ताव ।

चांगल्या दिवसांची
किती वाट पहाव ।
शेतकरी करतो
किती धावाधाव ।

चोर तो माल्या
बनुन बसला साव ।
व्यापार्यांना कीती
पैशाची हाव ।

उपाशी पोटी
झोपतो सारा गाव ।
मेहनत करुनही का
त्यानेच असे मराव ।

उठा कोणीतरी
सांगा बाजार भाव ।
मंतर द्या म्हणा
नाहीतर दिसेल प्रभाव ।

अतीच होतय आता
विसरा घुम जाव ।
जागा झाला बळी तर
उरणार नाही नाव ।
Sanjay R.

" लगे बादल भी रोने "

क्या लिख्खे हम
कहानी जिंदगी की
कलम मे स्याही
कुछ थम सी गयी है ।
Sanjay R.

निकले थे जब हम
बादलोको छुने
याद तुम्हारी आइ और
लगे बादल भी रोने ।
Sanjay R.

ये बादल ये हवा
कहती है कुछ
चल ले चल मुझे
कदम दो कदम कुछ ।
Sanjay R.

Tuesday, November 14, 2017

"मिळेल का हो ते बालपण परत "

झालो आम्ही मोठे जरी
हवं अजुन लहानपण तरी ।
हसणं खिदळणं रुसणं रागावणं
होते दिवस ते कीती भारी ।
मोठेपणाचा आव नुसता
मोठ्यांपेक्षा लहानेच बरी ।
आईचा मार बाबांचा धाक
फिरायचे नुसते दारोदारी ।
कट्टी बट्टी दोस्त दोस्ती
विसर पडायचा जायचे घरी ।
चिंचा बोरे चिमणीचा दात
मारपीट दंगा मस्ती सारी ।
परत मिळतील का हो ती
बालपणातली दिवसं सारी ।
Sanjay R.