देवा माणसांना
देरे माणुसकी ।
मनात फुलु दे
आपुलकी ।
खुप झाले
रे अविचार ।
नको आता
दुराचार ।
फुलु दे
सु विचार ।
मनात रुजु दे
सदा चार ।
जगा आणी
जगु द्या ।
मेल्या वरही
स्मरु द्या ।
Sanjay R.
देवा माणसांना
देरे माणुसकी ।
मनात फुलु दे
आपुलकी ।
खुप झाले
रे अविचार ।
नको आता
दुराचार ।
फुलु दे
सु विचार ।
मनात रुजु दे
सदा चार ।
जगा आणी
जगु द्या ।
मेल्या वरही
स्मरु द्या ।
Sanjay R.
जिवन वेलीला
धरला फुलोरा ।
प्रत्येक फुलाचा
गंधच न्यारा ।
फुला फलांचा
काय तोरा ।
खेळ रंगांचा
विलक्षण सारा ।
एक एक क्षण
एक जिवन धारा ।
आनंदाच्या लाटा
मनाचा पिसारा ।
कधी असेल
वादळ वारा ।
कधी फुलतो
आकाशी तारा ।
Sanjay R.
हिरवी झाडं पिवळा पाचोळा
शोधतो सावली सुगंघ वेगळा ।
दिवस रात्र लागला एकच चाळा
सांग मज तुझा का इतका लळा ।
थेंब थेंब पाण्यानं भिजला मळा
धरले दाणे बघा भरला खळा ।
Sanjay R.
काल बोलता बोलता सहज विषय निघाला मैत्री कशी असावी । मी म्हटलं क्रुष्ण सुदाम्या सारखी असावी । क्रुष्णाला आठवण यावी आणी सुदाम्याला उचकी लागावी ।
खरच अशीच असावी मैत्री ।
मी ई म्हणावं आणी मित्रानं री ओढावी । आपल्याला इच्छा व्हावी आणी मित्रानं ती पुर्ण करावी । दुखाःत दुखाःचा आणी सुखात सुखाचा वाटेकरी व्हावा । मनात नेहमी ओलावा असावा ।राग द्वेश लोभ मोह मत्सर यांचा लवलेशही नसावा । मित्र असाच असावा । हसतांना तोही हसावा । रडतांना अश्रु व्हावा । असला मीत्र तर असाच असावा । नाही तर मित्रच नसावा ।
Sanjay R.
काय म्हणता राव
खाता कशाला भाव ।
आपल्याच हातानं
करुन घेता घाव ।
आणी मग विनाकारण
नुसती धावा धाव ।
जाउ द्या आता
नका सोडु डाव ।
घट्ट धरुन ठेवा
मनावरचा प्रभाव ।
यशस्वी व्हाल
चमकेल नाव ।
Sanjay R.