Thursday, May 5, 2016

" हिरवा मळा "

हिरवी झाडं पिवळा पाचोळा
शोधतो सावली सुगंघ वेगळा ।
दिवस रात्र लागला एकच चाळा
सांग मज तुझा का इतका लळा ।
थेंब थेंब पाण्यानं भिजला मळा
धरले दाणे बघा भरला खळा ।
Sanjay R.

" मैत्री कशी असावी "

काल बोलता बोलता सहज विषय निघाला मैत्री कशी असावी । मी म्हटलं क्रुष्ण सुदाम्या सारखी असावी । क्रुष्णाला आठवण यावी आणी सुदाम्याला उचकी लागावी ।

खरच अशीच असावी मैत्री ।

मी ई म्हणावं आणी मित्रानं री ओढावी । आपल्याला इच्छा व्हावी आणी मित्रानं ती पुर्ण करावी । दुखाःत दुखाःचा आणी सुखात सुखाचा वाटेकरी व्हावा । मनात नेहमी ओलावा असावा ।राग द्वेश लोभ मोह मत्सर यांचा लवलेशही नसावा । मित्र असाच असावा । हसतांना तोही हसावा । रडतांना अश्रु व्हावा । असला मीत्र तर असाच असावा । नाही तर मित्रच नसावा ।

Sanjay R.

" धावा धाव "

काय म्हणता राव
खाता कशाला भाव ।
आपल्याच हातानं
करुन घेता घाव ।
आणी मग विनाकारण
नुसती धावा धाव ।
जाउ द्या आता
नका सोडु डाव ।
घट्ट धरुन ठेवा
मनावरचा प्रभाव ।
यशस्वी व्हाल
चमकेल नाव ।
Sanjay R.

Wednesday, May 4, 2016

" प्रयास "

कुणावर करायचा विश्वास
चालतात कथी जोरात श्वास ।
कधी नुसतेच होती आभास
मात्र मनात एकच  ध्यास ।
कर परत एकदा तु प्रयास
येउन पडेल यशाची आरास ।
Sanjay R.

Saturday, April 30, 2016

" कुछ वादे कुछ इरादे "

भावनांना नसते भाषा
तयासी प्रेमाची आशा ।
सोडुनी सार्या निराशा
धावते मन दशदिशा  ।
Sanjay R.

कभी उनकी यादे
कभी उनके वादे  ।
दिलमे न कोइ उमंग
न रहे कोइ इरादे ।
जिते जागते है हम
पिठपर बोझ लादे ।
अबभी चाहते उनको
कोइ उन्हे याद दिलादे ।
Sanjay R.