Friday, July 4, 2014

" रुप नवे "

चक्र निसर्गाचे बघा
कसे कुणा सांगावे ।
गाण प्रितीचे
हळुच गुणगुणावे ।

गुलाब मोगरा
निशिगंधानेही फुलावे ।
मनमोहक गंध त्यांचा
धुंद धुंद व्हावे ।

निळ्या आकाशी
एकत्रित ढगांनी व्हावे ।
मुसळधार पावसाने
धरेवरी उतरावे ।

लहान थोरांनी
त्यात भिजुनी घ्यावे ।
किलबील पाखरांची
उडती आकाशी थवे ।

खळखळ पाण्याची बघा
तुडुंब भरले तळे ।
फुलुन आली धरा
घेउन रुप नवे ।
Sanjay R.

निघतात ती पाखर
दिवेलागणीला घराकड ।
सुर्यह लोटुन देतो
प्रुथ्वितल अंधाराकड ।
Sanjay R.

Wednesday, July 2, 2014

" आतातरी येउ दे पाउस "

यंदा पावसाने
रचले एक नाटक ।
बळिराजा आकाशी
बघतो एकटक ।
Sanjay R.

आतातरी पाउस येउ दे ।
धरती ओली होउ दे ।
जिवात जिव माझा येउ दे ।
हिरवा निसर्ग आम्हा पाहु दे ।
आनंदात सार्यान्ना न्हाउ दे ।
दोन घास प्रेमान खाउ दे ।
Sanjay R.

चातका परी डोळे लाउनी
बघतोय तो आकाशी ।
नारायणा दुख: आमची
होत आहेत रे भारी ।
लोटुन दे पुर आसवांचा आता
नकोरे सांगु जाण्या फाशी ।
Sanjay R.

टोचलेला काटा
निघाला तर बर ।
नाहीतर देउन जखम
सलतो अंगभर । 
Sanjay R.

Thursday, June 26, 2014

" वाट पावसाची "

कीती रे बघायची वाट तुझी
कासेवीस होतो जीव आता ।
सार्यांनाच लागली आस तुझी
भिजउनी शांत कर मन आता ।
Sanjay R.


फुलांनी करु या स्वागत
तुझ्या माझ्या मैत्रीचे ।
खुप बरस रे पावसा
काम नाही आता छत्रीचे ।
Sanjay R.

Wednesday, June 25, 2014

" नको रे धाडु आम्हा व्रुद्धाश्रमी "

नियम तर आहेत सारे ।
पालन त्यांचे होत नाही ।
सवयच अशी जडली ।
शिक्षेच मुळीच भय नाही ।           
Sanjay R.

नको रे धाडु तु आम्हा व्रुद्धाश्रमी 
माया का दीली तुज आम्ही कमी ।

आहेस तु आमच्या पोटचा गोळा 
विचार कसा आला असला खुळा ।

कीती रात्री जागल्या आमही त्या काळ्या  बाबांची कष्ट कसा विसरलास रे बाळ्या ।

प्रेमळ तुझ मन का झाल इतक कठोर  थकलो रे आम्ही आता नको होउ निष्ठुर ।

मोठा तु झालास आणी खुप हो मोठा 
नशीबच खोट आमच पैसाही खोटा ।
Sanjay R.

मुलं मोठ्यांना कीती मीस करतात ।
थोड दुर होताच खुप रडतात ।
मोठी होताच मात्र स्वता:च दुर होतात । आईबाबांना आपल्या त्रास देउन रडवतात । Sanjay R.  

Sunday, June 22, 2014

" आभाळ गरजले "

देउनी जन्म त्यांना
अभागी झालो स्वता: ।
फुलवला जन्म त्यांचा
मरण देताहेत आता ।
sanjay R.   
 

कर्म धर्म संयोगाने
शिकलो आम्ही
जिवनाचा मर्म ।
क्रुतीत आणता आणता
मात्र किती कसे
झालो आम्ही बेशर्म । 
sanjay R.

आभाळ गरजले 
विज कडाडली ।
कायरे पावसा 
चिंता कीती तु 
आम्हा लावीली  ।
गरीब श्रीमंत 
व्याकळ झाले  ।
तुजवीण जिवन
कैसे चाले ।
Sanjay R.