Friday, July 4, 2014

" रुप नवे "

चक्र निसर्गाचे बघा
कसे कुणा सांगावे ।
गाण प्रितीचे
हळुच गुणगुणावे ।

गुलाब मोगरा
निशिगंधानेही फुलावे ।
मनमोहक गंध त्यांचा
धुंद धुंद व्हावे ।

निळ्या आकाशी
एकत्रित ढगांनी व्हावे ।
मुसळधार पावसाने
धरेवरी उतरावे ।

लहान थोरांनी
त्यात भिजुनी घ्यावे ।
किलबील पाखरांची
उडती आकाशी थवे ।

खळखळ पाण्याची बघा
तुडुंब भरले तळे ।
फुलुन आली धरा
घेउन रुप नवे ।
Sanjay R.

निघतात ती पाखर
दिवेलागणीला घराकड ।
सुर्यह लोटुन देतो
प्रुथ्वितल अंधाराकड ।
Sanjay R.

No comments: