Sunday, July 6, 2014

" दुखी: मन माझे "

निघाली आज नभांची स्वारी
बरसणार कधी आमच्या दारी ।

चिंतेत पडले सारे शेतकरी ।
घरात आहे मुलगी आजारी ।

करायची होती पंढरीची वारी ।
का अंत पाहतो पांडुरंग हरी ।

बरसु दे आता पावसाच्या सरी ।
जाउ नकोस दुर फीर माघारी ।

जगलो वाचलो तर करील वारी ।
Sanjay R.

कविता कुणाची प्राण आहे ।
कुणी कवितेचा फॅन आहे ।
कवी स्वत: एक ध्यान आहे ।
कवितेनच त्याचा सन्मान आहे ।
Sanjay R.

No comments: