Wednesday, July 2, 2014

" आतातरी येउ दे पाउस "

यंदा पावसाने
रचले एक नाटक ।
बळिराजा आकाशी
बघतो एकटक ।
Sanjay R.

आतातरी पाउस येउ दे ।
धरती ओली होउ दे ।
जिवात जिव माझा येउ दे ।
हिरवा निसर्ग आम्हा पाहु दे ।
आनंदात सार्यान्ना न्हाउ दे ।
दोन घास प्रेमान खाउ दे ।
Sanjay R.

चातका परी डोळे लाउनी
बघतोय तो आकाशी ।
नारायणा दुख: आमची
होत आहेत रे भारी ।
लोटुन दे पुर आसवांचा आता
नकोरे सांगु जाण्या फाशी ।
Sanjay R.

टोचलेला काटा
निघाला तर बर ।
नाहीतर देउन जखम
सलतो अंगभर । 
Sanjay R.

No comments: