Wednesday, June 25, 2014

" नको रे धाडु आम्हा व्रुद्धाश्रमी "

नियम तर आहेत सारे ।
पालन त्यांचे होत नाही ।
सवयच अशी जडली ।
शिक्षेच मुळीच भय नाही ।           
Sanjay R.

नको रे धाडु तु आम्हा व्रुद्धाश्रमी 
माया का दीली तुज आम्ही कमी ।

आहेस तु आमच्या पोटचा गोळा 
विचार कसा आला असला खुळा ।

कीती रात्री जागल्या आमही त्या काळ्या  बाबांची कष्ट कसा विसरलास रे बाळ्या ।

प्रेमळ तुझ मन का झाल इतक कठोर  थकलो रे आम्ही आता नको होउ निष्ठुर ।

मोठा तु झालास आणी खुप हो मोठा 
नशीबच खोट आमच पैसाही खोटा ।
Sanjay R.

मुलं मोठ्यांना कीती मीस करतात ।
थोड दुर होताच खुप रडतात ।
मोठी होताच मात्र स्वता:च दुर होतात । आईबाबांना आपल्या त्रास देउन रडवतात । Sanjay R.  

No comments: