Sunday, October 31, 2021
दूर किती किनारा
" दाटले डोळ्यात अश्रू "
दाटले डोळ्यात अश्रू
परी थेंब एक गळेना ।
ओठात थांबले शब्द
जिव्हा ही का वळेना ।
क्षण दुःखाचे भोगतो
नशिबाचे का कळेना ।
भावना ही या सरल्या
पीडा पाठची टळेना ।
शोधतो सुख दुःखात
का मज तेही मिळेना ।
दिले दुःखच मी पेटवून
तरीही का ते जळेना ।
Sanjay R.
Friday, October 29, 2021
" टोचला काटा माझ्या पायात "
टोचला काटा माझ्या पायात
काढू कसा मी तर वाटेत ।
चालता येईना मज आता
हात घ्या राया थोडा हातात ।
सलतो कसा हो तो छातीत
केलंय घर त्यानं पायात ।
उठु ना देई तो बसू ना देई
लक्षच माझे हो त्याच्यात ।
कुणीतरी काढा हळूच जरा
आसवं आलेत ना डोळ्यात ।
उशीर होतोय हो जायाला
अडकले मी या काट्यात ।
Sanjay R.
Thursday, October 28, 2021
" शब्दांची किमया सारी "
शब्दांना हवी वाचा
नकोच ते मुके ।
होते विरळ सारे
नात्यातले धुके ।
शब्द करी अनर्थ
कधी कोणी चुके ।
शब्दांना हवी गोडी
नाते तिथेच टिके ।
शब्दांची किमया सारी
मग पाषाण ही झुके ।
जोडतो बंध मनाचा
दुःखही वाटे फिके ।
Sanjay R.
Wednesday, October 27, 2021
" नाकावरती रुमाल "
" ओंजळ "
Tuesday, October 26, 2021
आयुष्य शंभर वर्षाचे
" भीती आम्हास कुणाची "
भीती आम्हास कुणाची
वाटे आमच्याच मनाची ।
अंतरात दडून सारे
येते आठवण तयाची ।
भीती दाखवी कोणी कधी
दयनीय स्थिती हृदयाची ।
लागे मग सदा काळजी
मंद गती होई श्वासांची ।
नको दाखवू तू रे भीती
सावली तुजवर स्वार्थाची ।
निर्भय आम्ही झालो आता
भीती न उरली चरितार्थाची ।
Sanjay R.
Monday, October 25, 2021
कशास म्हणू मी माणुसकी
कशास म्हणू मी माणुसकी
नि कशास न म्हणू ।
स्वार्थाने तर भरले डोके
हवा पैसा तो कुठून आणू ।
हवे थोडे सुख समाधान
अर्ध्यावरती कसा माणू ।
बघतो मी मग जमेल तिकडे
घेतो काढून जसा माझाच जणू ।
दुःख कशाचे सुख भोगतो
आनंदाला का उगाच ताणू ।
कलंक असू द्या माथ्यावरती
भूषण मजला त्याचेच म्हणू ।
Sanjay R.
" हवी साथ मला "
हवी साथ मला
हवा हात मला ।
नको एकटेपणा
सांगू कसे तुला ।
आठवतात क्षण ते
हसवायचो मी तुला ।
इश्य तुझ्या गालावर
लाजवायचो मी तुला ।
लटकाच तुझा राग
व्हायचा मग अबोला ।
वेन्धळा मी हा असा
फसायचो मीच तुला ।
तुझ्याविना करमेच ना
विसरेल कसा मी तुला ।
आठवणींच्या सागरात
काठ हवा तुझा मला ।
Sanjay R.
" भावनांचा खेळ सारा "
Sunday, October 24, 2021
" विचारांचे करूच काय "
Saturday, October 23, 2021
" परिपाठ तोच "
काळ भुताचा असो
वा असो भविष्याचा ।
परिपाठ तर आहे तोच
सम्पूर्ण या जीवनाचा ।
दोष काही आहे यात
आपल्याच नशिबाचा ।
हसतो थोडे रडतो थोडे
आनंद त्यात जगण्याचा ।
दुःखात बघतो मी सुख
खेळ सारा आहे मनाचा ।
Sanjay R.
" कसा विसरायचा भूतकाळ "
Friday, October 22, 2021
" नको निरोपाची भाषा "
" उत्तर मग देता येत नाही "
कामाचा गराडा इतकाकी
उत्तर मग देता येत नाही ।
मनात तर असते खूप सारे
वाटतं लिहावे शब्द काही ।
लिहायचे काय सुचतही नाही
विचार पडतो मग असाही ।
त्यातच जातो विसरून सारे
हरवून जातो मग तुझ्यातही ।
Sanjay R.
Thursday, October 21, 2021
" फिरू नको मागे "
हरु नको पाखरा
फिरू नको मागे ।
उठ जरा डोळे उघड
जग झाले जागे ।
बघ जरा कोण कुठे
जायचे तुजला पुढे ।
पसर थोडे तुझे पंख
ढगही आकाशात उडे ।
नको गर्व कशाचा
आहे पुढेच ही वाट ।
संकटाला सार मागे
आहे दुष्टांशी गाठ ।
Sanjay R.
" वेळेची काय किंमत "
वेळेची काय किंमत
कधी होते मग गम्मत ।
वाराती मागून घोडे येते
मग वाटते थोडी जम्मत ।
वेळ ठरते कधी भेटीची
सगळेच होतात सम्मत ।
पण येत नाहीत वेळेवर
वाट बघून तुटते हिम्मत ।
स्टॅंडर्ड टाइम म्हणतात ना
चालतो तो थांबत थांबत ।
सारेच होते उशिरा मग
वेळ जातो असाच लांबत ।
वेळेचे महत्व कुठे कुणाला
गप्पा बसतात सांगत ।
इतरांचा होतो तितम्बा
राहतो आपणच रांगत ।
Sanjay R.
Wednesday, October 20, 2021
" नाही भावनेच्या खुणा "
जाऊ नको पुन्हा
होईल तो गुन्हा ।
मार्गच तो वेगळा
जरी असेल जुना ।
नसेल कोणी तिथे
असतो सुना सुना ।
विचारून बघ जरा
तू आपल्याच मना ।
असेल जरी नाते
नाही भावनेच्या खुणा ।
काळीज उरले कुठे
म्हणे असेल ते छिना ।
Sanjay R.
" काम "
Tuesday, October 19, 2021
" गीत गोड प्रकाशाचे "
गाऊ चला गीत गोड प्रकाशाचे
तेज पसरले कसे पूर्ण चंद्राचे ।
धारा बरसते मधुर त्या अमृताची
गालात हसणे बघा चांदण्यांचे ।
धरला फेर कसा तो भोवताली
रूप अनोखे दिसे आज गगनाचे ।
रात्र आज बहरली कोजागिरीची
क्षण वेचते धरा हसत आनंदाचे ।
Sanjay R.
" रात्र प्रकाशाची "
Monday, October 18, 2021
" कुठे उरली माणुसकी "
नाहीच उरली माणुसकी असे आपण ठोसपणे नाही म्हणू शकत पण माणुसकीचा ऱ्हास झाला हे मात्र मान्यच करावेच लागते .प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. तो फक्त स्वतःच तेवढं बघतो.
स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही पातळीला जाण्यास तयार होतो. काहीही करण्यास तो मागे पुढे पहात नाही. भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचीही त्याला चिंता नसते. विचार असतो तो फक्त आजचा. आपल्या खिशाचा. आपल्या सुखाचा. भलेही ते सुख क्षणिक का असेना. आणि माणूस माणसालाच लुटायला निघतो. मग आपण सहजच म्हणून जातो, माणूसकीच उरली नाही.
अशीच एक ही कथा आहे माणुसकीची, आमच्या सदाशिवाची.
छोट्याश्या गावात राहणारा सदाशिव. घरात म्हातारे आई वडील , दोन बहिणी, दोघीही लग्नाच्या. बायको आणि दोन शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं. घरात तो एकटाच कमावता. घरी चार एकर जमीन तीही नेहमीच ऐन वेळेवर धोका देणारी. सदाशिव कसा बसा संसाराचा गाडा ओढत होता. त्याच्या कष्टाची तर सीमाच नव्हती. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचे अमाप कष्ट चालत असत. कधी आपल्या शेतातले काम सोडून कुणाच्या दुसऱ्याच्या कामालाही जावे लागे. तेवढीच प्रपंचाला मदत होत असे. सोबतीला आई, बायको, बहिणी ही राबायच्या. पण परिस्थितीत काहीही फरक पडत नव्हता. दिवसेनदिवस सदाशिवची परिस्थिती खराबच होत चालली होती. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. बियाणे, खते, औषध यांच्या किमती वाढतच चालल्या होत्या. कर्जा शिवाय तर शेती करणेच कठीण होते. आधीच पैशाची तंगी. त्यात काही आगाऊचा खर्च आला तर सावकारा शिवाय काहीच पर्याय नसायचा. शेतात मजुरीचा खर्च तर न झेपणाराच होता. आणि पीक मात्र हमखास धोका देऊन जायचे. कधी पावसाचा मार, कधी पुराची धार. कधी कीटकांचा हल्ला तर कधी सगळे बरोबर असताना मालाच्या किमतीवर व्यापाऱ्यांची चालायची कुऱ्हाड. दाम मिळत नाही बरोबर. सगळीकडून शेतकऱ्यावरच पडतो मार .
सदाशिव बहिणींच्या लग्नासाठी खूपच काळजीत होता. बहिणी पाहायला बऱ्या असून सुद्धा हुंड्या पाई लग्नच जुळत नव्हते. बहिणींचे वय वाढत होते. जसजसे दिवस जात होते तसतसे सदाशिवची श्वासांची गतीही वाढत होती. काय करावे कुठून आणावा हुंड्याचा पैसा काही उपायच दिसत नव्हता. लग्नालाही खर्च लागणारच होता. दोघींचेही लग्न सोबत जुळवून एकाच मांडवात झाले तर ते त्याला परवडणारे होते. पण नशिबाने तशी साथ मिळायला हवी होती.
अचानक एक दिवस बाबाराव निरोप घेऊन आले. उद्या पाहुणे येणार. मुलगा नागपूरला नोकरी करतो. एक छोटा भाऊ आहे. तोही नागपूरलाच नोकरी करतो. सदाशिवला आशेचे किरण दिसले. त्याने पाहुण्यासाठी चहा पोहे ची व्यवस्था करून ठेवली. आजूबाजूच्या खुर्च्या जमा केल्या. घर छोटे असल्याने अंगणातच बसायची व्यवस्था केली. हे स्थळ आता जाऊ द्यायचे नाही असा पक्का निर्णय केला. घरातही त्याने सगळ्यांना बजावले. सगळं वयवस्थित व्हायला पाहजे. कोणत्याही परिस्थितीत लग्न जुळलेच पाहिजे.
दुसऱ्या दिवशी पाहुणे पोचले. चहा, पोहे आटोपले. पहाणीचा कार्यक्रम आटोपला. पाहुण्यांनी आपली पसंती दर्शवली. पुढची बोलणी सुरू झाली. मुद्दा हुंड्यावर आला. मूलाकडच्यानी पाच लाखाची मागणी केली. सदाशिवला तर घामच फुटला. त्याला काय बोलावे सुचेच ना. त्याने पाहुण्यापुढे हात जोडले आणि म्हणाला. भाऊ साहेब माह्या परिस्थितीचा थोडा इचार करा जी. इतका पैसा कुठून आणीन मी. माह्या बहिणीले पदरात घ्या. जे काही होईन थे मी करतो जी. पर इतका पैसा कसा जमन , थोडा इचार करा भाऊ साहेब. मले अजून एक जबाबदारी पार पाडाची हाये. थे बी पाहा लागण जी. महावर उपकार करा जी, जन्मभर मी तुमचा दास होऊन राहीन जी. सदाशिवची ती लाचारी बघून घरात आई, बहिणी, बायको सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. मुलाकडचे काहीच ऐकायला तयार नव्हते. ते पाच लाखावर अडूनच बसले होते. सदाशिवने मग आशाच सोडली. आणि मग तो पाहुण्यांना म्हणाला जाऊ द्या भाऊसाहेब नशिबात जे असं ते होईन. मी दीड लाख देईन, कसही करून मी एवढं जमवतो, पण या उपर काही मी काही देऊ शकत नाही. बसा चहा घ्या आन मग निघा पायजे त , असे बोलून त्याने घरात परत चहा ठेवायला सांगितले. त्याचे निर्वाणी चे शब्द ऐकून मुलाकडचे लोक गोंधळले. त्यांना पण वाटायला लागले आता सोयरीक तुटते. सगळे चूप होते. तेवढ्यात चहा आला. चहा होताच सदाशिवने पान सुपारी समोर केली. आणि पाहुण्यांना हात जोडले. कुणाच्याच तोंडातून शब्द निघत नव्हते. शेवटी सदाशिवचा दोस्त मधुकर बोलला. पहा भाऊसाहेब पैसा काय आज येईन उद्या जाईन, पर सबंध झाला त थो आयष्यभर राहीन, इचार करा तुम्ही. म्हणत असान त कुंकू बलावतो. पोराले कुंकू लावून टाकू. मंग आरामात लग्नाची तारीख काढत राहू. सगळे एकमेकांकडे बघत होते. कोणीच बोलत नव्हते. मग मधूकरच बोलला, सदा बोलाव गा कुंकू. मग मुलाला टिकला लागला. लग्न पक्के झाले.
मग पाहुण्यांनीच एक अजून प्रस्ताव पुढे केला , तुमची लहान बहीण आमच्या लहान पोराले दाखवा, जमलं त इथंच दुसरं बी फायनल करून टाकू. तसा सदाशिव घरात गेला आणि आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन आला. लहान मुलाची मुलीची पसंती झाली. परत गोष्ट हुंड्यावर आली. तसा मधूकरच बोलला, जे सदान मोठ्या बहिणीले दिलं तेच छोटी ले बी देइन. सांगा लावाचा का टीका. परत कोणी बोलत नव्हतं. सगळे शांत झाले होते. मग मधुकर स्वतःच बोलला आणा कुंकू , हे बी फायनल करून टाकू. सदा आन भाऊ कुंकू. मग लहान मुलाला पण टीका लागला. एकाच बैठकीत, एकाच घरात दोन्ही बहिणींचे लग्न जुळले. सदाशिवला आनंद तर झाला पण मोठी चिंताही लागली. एवढे पैसे आणायचे कुठून तीन लाख हुंड्याचे आणि कमीतकमी दोन लाख बाकीचा खर्च. सगळं मिळून पाच लाख लागणार होते. पाहुणे परत जाताच सदाशिव तर डोकेच धरून बसला.
पैशाच्या जमवाजमविचा हिशोबच लागत नव्हता. सदाशिवला काहीच सुचत नव्हते. आधीच सावकाराचे देणे बाकी होते. आता परत तो कसा देईल ही चिंता होती. घरात तर एकही पैसा नव्हता. बायकोचे काही दागिने होते, त्यांची किंमत किती होईल ते बघायला पाहिजे होते.
काही दोस्त मित्र थोडी मदत करतील पण त्यांचेही पैसे मग परत करावे लागतील. सदाशिवला खूपच चिंता लागली होती. त्याला रात्री झोप सुद्धा लागत नव्हती.
हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला. मुलाकडे तीन लाख पोचले होते एक लाख देणे बाकी होते.कपडे, किराणा, मंडप डेकोरेशन सगळंच उधारीत होत. लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलाकडून फोन आला. ते पैशाची चौकशी करत होते. सदाशिव लाचारीने त्यांना थोडं थांबायचं सांगत होता. पण ते लोक ऐकायलाच तयार नव्हते. हुंड्याची रकम पूर्ण दिली नाही तर दोन्ही नवरदेव मांडवात येणार नाही असे सांगत होते. सदाशिवला मार्गच दिसत नव्हता. तो परत सावकाराकडे गेला. सावकाराने पिकासकट जमीन गहाण करण्याचा सल्ला दिला. सदाशिवचे मन तयार होत नव्हते. पण दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता. त्याने सावकाराकडे शेवटी शेती गहन केली आणि पैसे घेऊन मुलाकडे पोचला. पैसे देऊन परत आपल्या गावाकडे निघाला. पण त्याला घरी जायचीच इच्छा होत नव्हती. आता घरी काय सांगायचे हा प्रश्न त्याला पडला शेती गहाण झाली. यंदाचे तोंडावर आलेले पीकही सावकार नेणार. मग करायचे काय. बाकी देणे कुठून पूर्ण करायचे . काहीच सुचत नव्हते. सदाशिव कसा बसा घरी पोचला. शरीरात ताप भरला होता. लग्न दोन दिवसावर होते. त्याने सगळा धीर एकवटला आणि तयारीला लागला.
लग्न पार पडले. बहिणी सासरी गेल्या . आणि सदाशिवचा ताप अंगावर निघाला. तो तीन दिवसांपासून बेशुद्ध पडला होता. कशाचीच शुद्ध नव्हती. घरात आई वडील बायको मुलं सगळे चिंतेत होते. सदाशिवला दवाखान्यात नेणे आवश्यक होते. पण घरात तिकिटाचेही पैसे नव्हते. सदाशिव खाटेवर निश्चल असा पडलेला होता. बायको सारखी रडत होती. शेवटी तिनेच लग्न झालेल्या आपल्या नंदेला फोन लावला. आणि सदाशिवचे काही खरे नाही. तुम्हा बहिणींना शेवटचे भेटायचे असेल तर जशा आहात तशा निघा आणि पोहचा. बहिणींनी त्यांच्या घरी सगळी हकीकत सांगितली. सगळे सदाशिवला भेटायला निघाले . मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचे मन द्रवले. त्याने सोबत डॉक्टर ला घेतले. डॉक्टर ने ही चौकशी करून औषध सोबतच घेतले. सगळे सादाशिवच्या घरी पोचले. सदाशिव बेशुद्धच होता. डॉक्टरने ताबडतोब आपला उपचार सुरू केला , सलाईन लावले. आता थोडी सदाशिवची हालचाल होत होती. पण अशक्तपणा खूप आला होता. पण सदाशिव मरणाच्या दारातून परत आला होता. मूलाकडच्यानीच सगळी चौकशी करून . सावकाराचे सम्पूर्ण देणे फेडले आणि शेताचे गहानपत्र परत आणले. ते सदाशिवला ला देऊन आपण केलेल्या चुकीची माफी मागितली.
सदाशिवचे संकट कमी झाले होते. त्याला दोन्ही जावई देवच वाटायला लागले होते.
Sanjay Ronghe
Nagpur
Sunday, October 17, 2021
" उत्तर फक्त एक "
प्रश्न किती अनेक
उत्तर फक्त एक ।
आहे जगायचे मला
विचार किती नेक ।
जगण्यासाठी सारी
चढाओढ चाले ।
हाती कुणाच्या पुष्प
तर कुणाच्या भाले ।
वादळ वारे येती
देऊन दुःख जाती ।
उरते काय शेवटी
या रिकाम्या हाती ।
घेतो वेचून क्षण
काही थोडे सुखाचे ।
आसवं सुकून गेली
करू काय दुःखाचे ।
Sanjay R.
" नको प्रश्न नको उत्तर "
Saturday, October 16, 2021
" काहूर म्हणू की पूर "
" दुःखाला कुठे अंत "
" काहुर किती हे दाटले मनात "
काहूर किती हे दाटले मनात
सांगूं कसे तुजला मी शब्दात ।
विचार होतील व्यक्त कागदात
भावना कशा येतील लेखणीत ।
सूर गवसेना माझ्या या ओठात ।
मूक झालेत सारे, सांग कानात ।
जीवनाला तर हवी थोडी किनार
तुझ्याविना निरस सारे जगण्यात ।
Sanjay R.
Friday, October 15, 2021
आला दसरा दिवाळी येणार
आला दसरा दिवाळी येणार
चुन्नू मुंनू नवीन कपडे घेणार ।
घराला झाली रंग रंगोटी ।
दिवाळी करायची यंदा मोठी ।
मागची दिवाळी घरातच गेली
सगळी खुशी कोरोनाने नेली ।
मिठाई फटाके सगळंच आणू
आईही करेल नवीन काही मेनू ।
यंदा जायचेच मामाच्या गावी
मिरवायला थोडी हौसच हवी ।
लुटायची खूप दिवाळीची मजा
शाळेत गेल्यावर असेल सजा ।
Sanjay R.
Thursday, October 14, 2021
" ४नेमकच गेलं राहून "
Wednesday, October 13, 2021
" आठवण करत नाही कोणी "
आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।
तेव्हा पासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।
Sanjay R.
" आठवणी "
आठवणीच तर देई
क्षणाचा दिलासा ।
टाकतो कधी मग
श्वासात उसासा ।
येते कधी असेच
मुखावर हास्य ।
तर कधी डोकावते
डोळ्यात आसवं ।
सोडू कसे सांग
त्या आठवणींना ।
त्याच तर आहेत
सोबती मनाच्या ।
आयुष्याची साथ
भासे सुखाच्या ।
झेलतात वेदना
माझ्या हृदयाच्या ।
Sanjay R.
Tuesday, October 12, 2021
" आयुष्याचे गणित अवघड "
विचार करण्यास सवड नाही
आयुष्याचे गणितच अवघड ।
दिवस रात्र घालतो पालथी
जगण्यासाठीच सारी धडपड ।
बोलू कुठे मी सांगू कुणाला
निश्फळ होते सारी बडबड ।
कष्टाविना तर मिळेना काही
जीवन झाले सारेच गडबड ।
Sanjay R.
सूर्याने मग मज केले जागे
स्वप्न तुझे ते गोड किती
फुलली मनात माझ्या प्रीती ।
वाटे मजला सांगू कसे मी
स्वप्नात अपुली जुळली नाती ।
हरवून गेलो कुठे कसा ग
हात तुझा मी घेऊन हाती ।
रातराणीच्या गंधात न्हालो
हसत होता चंद्रही राती ।
सुर्याने मज मग केले जागे
आभास सारे अनोखी प्रीती ।
Sanjay R.
Monday, October 11, 2021
" एक स्वप्न अनोखे "
पाहिले मी पहाटेस
एक स्वप्नच अनोखे ।
गर्दीत अडकलो मी
सोबतीला तुही सखे ।
आली गळ्यात कोरड
सावली मज का रोके ।
निघेना शब्द मुखातून
चहूकडे फक्त धोखे ।
गेलीस निघून तू दूर
जगणेच वाटे फिके ।
आवाज तुझा ऐकून
पकडले मीच डोके ।
Sanjay R.
Sunday, October 10, 2021
दिसे तेज
कोण कशात तरबेज
चेहऱ्यावर दिसे तेज ।
इतिहास बघा जरा
भविष्याला एक पेज ।
वाहवा होईल सारी
आहे बदलायचा आज ।
विजयाचा वेगळा बाज
असेल वेगळा अंदाज ।
Sanjay R.
" सत्य टाकतो पुरून "
सत्य टाकतो पुरून
अफवांचा येता पूर ।
खोट्याचा बोल बाला
लागे दुष्टांचा सूर ।
स्वप्न सुखाचे जिथे
दुःखात होते चुर चुर ।
रक्ताचे वाहती पाट
दुष्ट इथले आतुर ।
भ्रष्टच झाली बुद्धी
होते किती ते चतुर ।
झाले सारे इथे आता
नरभक्षक आसुर ।
उरली कुठे दया माया
माणुसकी तर दूर ।
असत्त्वच मिटले सारे
जिकडे तिकडे धूर ।
Sanjay R.
Saturday, October 9, 2021
" उरले आता मरण "
" फुंकर "
Friday, October 8, 2021
" नव रंग "
मज कळेना
Thursday, October 7, 2021
कृपा तुझीच हवी माते
कोणी असो नसो
असते सोबत सावली ।
बाळाच्या मागे पुढे
सदा असतेच माऊली ।
भाव तुझ्या चरणी माते
संकटात तू मज पावली ।
येता प्रसंग किती कसाही
मदतीसही तूच धावली ।
गातो मी जयकार तुझा
भक्त तुझा मी माऊली ।
कृपा हवी तुझीच माते
सदा असू दे सावली ।
Sanjay R.
झाला अर्थाचा अनर्थ
" असेच तू हसत राहा "
Wednesday, October 6, 2021
" अंतरीचे सुख "
जीवनात या
दोनच वाटा ।
सुख दुःखाला
आहे कुठे तोटा ।
कोण चूकतो
छोटा वा मोठा ।
भुके पुढे बघा
पैसाही खोटा ।
नशिबाचा खेळ
डोईवर गोटा ।
लोळतो कुणी
उशाखाली नोटा ।
असाल दुःखी
सुखाला भेटा ।
सुखात असता
थोडे कष्ट रेटा ।
वैकुंठाच्या दारात
नाही कोणी मोठा ।
असू दे देवा मज
असाच रे छोटा ।
Sanjay R.
" सुख नाही तरी "
किती ही धावपळ
कशासाठी धडपड ।
पैसा पैसा करत
चाले सारी गडबड ।
चुकते कधी वाट
सोसणाऱ्याची तळमळ ।
सुख नाही तरी
डोळ्यात अश्रू भळभळ ।
पाणी कुठे हो थांबते
वाहते ते झळझळ ।
भोगतो सारे भोग
कुणाला अशी हळहळ ।
Sanjay R.