Monday, September 13, 2021

" दिसे मृगजळ जेथे "

ही वाट कुठे जाते
दिसे मृगजळ जेथे ।
अविरत सावरे भार
पडते पाऊल तेथे ।
वाटे पहुडली निश्चिन्त
ताप उन्हाचा सोसते ।

कोसळतो पाऊस जेव्हा
पाण्यासही वाट देते  ।
रात्रीलाही असते तत्पर
हवे तिथे ती घेऊन जाते ।

जंगल दरी वा असो खोरे
जाई पुढेच कधी न सरते ।
धोंडे दगड येई मधेच
तरी कधीही ती न हरते ।
Sanjay र.

No comments: