Thursday, August 26, 2021

" भाव भावनांचा खेळ सारा "

भाव भावनांचा खेळ सारा
मधेच येतो सुसाट वारा ।

लोप पावतो गगनात तारा
कडकड वीज देते इशारा ।

वाजे नभात ढोल नगारा
होतात सुरू पाऊस धारा

चिंब भिजतो सारा पसारा
नेतो वाहून  उभा निवारा ।

वाहे डोळ्यात अश्रूं धारा
पुसायला कोण, नाही थारा ।
Sanjay R.


No comments: