Sunday, August 29, 2021

नितु - राणी भाग 2

     
     आज राणी ला काही केल्या झोप येत नव्हती. तिचे सारे लक्ष नितु कडेच जात होते. नितुला खूप ताप भरला होता. टेम्प्रेचर एकशे चार च्या वर दाखवत होते. श्वास जोरा जोरात चालत होते. इतक्या तापामुळे तो कण्हत होता. राणी थंड पाण्याच्या पट्ट्या करून नीतीनच्या डोक्यावर ठेवत होती. सारखे त्याचे टेम्प्रेचर मोजत होती.
डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या . सगळ्या टेस्ट आटोपल्या होत्या पण रिपोर्ट उद्याला मिळणार होता. राणीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता . रात्रभर ती नीतीनच्या उशाला बसून होती. तिला खूप काळजी वाटत होती. सारखे डोक्यात विचार येत होते, रिपोर्ट काय येतील. कसे येतील. तिचा रात्रभर देवाकडे धावा सुरू होता .  तिला वाटत होते. नितीन लवकर बरा व्हावा.
नाईक ही हॉल मध्ये रात्रभर फेऱ्या मारत होते. मध्ये मध्ये येऊन ते नितीन ला पाहून जात होते .
ते वारंवार राणी ला झोपायला जायचे सांगत होते. पण राणी नितीन च्या दूर व्हायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती.  तिला नितु मीतू चा खूप लळा लागला होता. आता तीला मुलांपासून दूर व्हायचा विचारच कधी शिवत नव्हता. तीचे दोघांवरही खूप प्रेम जडले होते. त्यांना ती आपलीच मुले समजून सांभाळत होती.  ती त्या दोन्ही मुलांची आईच झाली होती.

      अशातच सकाळ झाली. नितीनला आता झोप लागली होती. तो शांतपणे झोपला होता. ते पाहून राणी सकाळच्या कामाला लागली. आज तिने सकाळीच स्वयंपाक करून घेतला. नितीन साठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढून ठेवले. तो पर्यंत मीतू आणि नाईक जागे झाले. तिने नाईकांना चहा दिला. नाईक खूप तणावात दिसत होते. त्यांना रात्रीचे जागरण आणि नितुची काळजी सारखी स्वस्थ बसू देत नव्हती. नाईक तयार होऊन डॉक्टरांकडे रिपोर्ट घ्यायला गेले.  मीतूला दूध नास्ता देऊन, तिला तयार करून परत राणी परत नितु शेजारी जाऊन बसली. नितु अजूनही झोपेतच होता. राणीने त्याचे टेम्प्रेचर मोजले. आता नितुचा ताप कमी झाला होता.  मधेच तो जागा झाला. आता त्यालाही बरे वाटत होते. राणीने त्याचे हात पाय चेहरा कोमट पाण्याने पुसून दिले. त्याचे कंगव्याने केस व्यवस्थित करून दिले. आणि किचन मधून तिने दूध कोमट करून आणले. आता राणी चमच्या चमच्याने नितुला दूध भरवत होती. तेवढ्यात नाईक डॉक्टरांकडून परत आले. त्याचा चेहरा थोडा काळजी मुक्त वाटत होता. ते येताच राणीने त्यांना पाणी दिले. तसे नाईकच बोलले.  सगळे रिपोर्ट  नॉर्मल आले आहेत.  काळजी करण्याची गरज नाही. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिलीत ती पण सोबतच घेऊन आलो. दोन तीन दिवसात नितीन नॉर्मल होईल.  खेळा फिरायला लागेल. थोडा विकनेस राहील पण लवकरच भरून निघेल असे डॉक्टर बोलले. ते थर्मा मीटर घे बरं टेम्प्रेचर बघू या किती आहे ते. तशी राणी थर्मामित्र घेऊन आली आणि तिने ते नाईकांच्या हाती दिले. नाईकांनी नीतीनचे  टेम्प्रेचर मोजले ते छ्यान्नव भरले. आता ताप पूर्ण पणे कमी झाला होता. नाईकांचे टेन्शन कमी झाले होते. राणीलाही बरे वाटत होते. मनोमन तिने देवाचे आभार मानले.
दोन दिवसातच नितीन चांगला झाला आणि खेळायला फिरायला लागला.  पण नाईकांना आता वेगळाच विचार सारखा सतावत होता.

      आज रविवार होता सगळेच थोडे उशिरा झोपून उठले. तशी राणी तयार होऊन आपल्या कामाला लागली. तिने नाश्त्यासाठी उपमा केला होता. आणि तिघांनाही प्लेट मध्ये काढून दिला. सगळे आरामात आनंदात उपम्याचा स्वाद घेत होते. तसा नाईकांनी राणी ला आवाज दिला. आणि तिलाही आपली प्लेट भरून घ्यायला सांगितले . राणीने आपली प्लेट भरून घेतली. नाईकांनी राणीलाही डायनिंग टेबल वर बसवून घेतले. तितक्यात  मीतूला ठसका लागला तशीच राणी धावत पळत किचन मध्ये गेली आणि तिने मीतू साठी पाणी घेऊन आली. तिने आपल्या हाताने मीतूला पाणी पाजले. तिच्या पाठीवरुन हात फिरवला.  राणी खूप वेळ मीतूची पाठीवरुन हात फिरवत राहिली. नाईकांना ते बघून खूप छान वाटले. राणीचे दोन्ही मुलांवर सारखेच प्रेम बघून नाईकांना भरून आले. तसे ते मुलांकडे बघून बोलले. राणी तुम्हा दोघांचीही किती काळजी घेते. तुम्ही तिच्या साठी काय काय करता सांगा बरं. तशी मीतू म्हणाली आम्ही पण राणी आंटीवर खूप प्रेम करतो. आम्हला ती खूप आवडते. आम्ही तिच्या शिवायचा तर आता विचारच करू शकत नाही. पप्पा तिला सांगा ना रोज माझ्या सोबत झोपायला. ती तिकडे आऊट हाऊसला जाऊन झोपते. तिला माझ्या सोबतच झोपायला सांगा. मी म्हटले पण ती ऐकत नाही. तुम्ही सांगा आत्ता . तुमचेच ती ऐकेल. पप्पा सांगा ना तिला काही.
तसे मीतूचे बोलणे ऐकून नाईकांना खूप छान वाटले. त्यांनी मीतूला विचारले तुला राणी तुझी आई झाली तर आवडेल का. तसे नितु मीतू दोघेही एक स्वरात बोलले खरच पप्पा आम्हाला खूप आवडेल. सांगा  आत्ता सांगा आंटी ला आमची आई हो म्हणून.   तशीही ती आमची आता आईच आहे. तीच तर आमचं सगळं सगळं करते.  आंटी तू हो म्हण ना. तसे राणी ने दोघांनाही आपल्या कुशीत घेतले आणि दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवायला लागली. नाईक राणीचा होकार समजले होते.

     राणीच्या या अबोल होकारावर नाईक खूप समाधानी होते. त्यांना अशाच मुलावर खुप प्रेम करणाऱ्या साथीदाराची गरज होती. तशी राणी सुस्वरूप सुस्वभावी होतीच. आणि मुख्य म्हणजे ती सम्पूर्ण घराचा भार उचलण्यास पूर्णपणे समर्थ अशी जोडीदार होणार होती. त्याबद्दल नाईकांना  पूर्णपणे खात्री होती. फक्त ती एका गरीब कुटुंबातली स्त्री होती. तिच्या मागे आज कुणीच नव्हते. ती पूर्णतः एकटीच होती. आणि तिला नाईकांचाच पूर्णपणे आधार होता. पुढेही ती तेच प्रेम मुलांवर कायम ठेवेल याबद्दल कुठलीच शंका घ्यायला जागा नव्हती. मुलांनीही तिला आपल्या आईचा दर्जा अगोदरच दिला होता. आता फक्त कायदेशीर रित्या नाईक आणि राणी यांच्या नात्याला बंधनात बांधायचे तेवढे बाकी होते.  नाईकांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. तितक्यात रितूचा आवाज नाईकांच्या कानी पडला. मीतू नितुला सांगत होती. नितु दादा उद्या माझ्या क्लास टीचर नि स्कुल मध्ये पालकांना मीटिंग साठी बोलवले आहे. मी आईलाच सोबत घेऊन जाऊ कारे. त्यावर नितीन बोलला माझ्या पण टीचरनी पालकांना मीटिंग साठी बोलावले आहे. आपण आईलाच सोबत घेऊन जाऊ या. चल आपण आईला त्यासाठी तयार  करू या. आणि पप्पांना पण आई ला सोबत यायला सांगा म्हणून सांगू या.  नाईकांना ते बोल ऐकून खूप छान वाटले.




No comments: