Friday, July 23, 2021

" होत नाही वारी "

वर्ष झाले दोन
होत नाही वारी ।
विठोबाचे भक्त
हिरमुसून घरी ।

दर्शनाची ओढ
माऊलीच्या दारी ।
दिस आले कसे
पडतात भारी ।

नामाचा जयघोष
नाही आता कानी ।
पावले जखडून
केले काय कोनी ।

क्षणोक्षणी विठ्ठल
येतो माझ्या ध्यानी ।
विचार नाही दुसरा
येत आता मनी ।

भिजले डोळे आता
किती येतील सरी ।
दर्शनाचा भुकेला
शोधतो दिशा चारी ।

दिसते स्वप्नात
विठोबाची पंढरी ।
मुखी घोष नामाचा
म्हणतो हरी हरी ।
Sanjay R.


No comments: