Tuesday, April 6, 2021

" पैशाचा गंध "

इल्या आमचा एकदम भारी
त्याला आहे एकच छंद ।
झोपेत पण ओळखेल हो
कोऱ्या नोटांचा गंध ।
हुंदडेल तिथेच हादडेल
पैश्या मध्ये होतो धुंद ।
असू द्या ना म्हणतो
कितीही कशाचे निर्बंध ।
गती कामाची तुमच्या
करा ना थोडीशी मंद ।
पैसेच पैसे येतील म्हणे
फक्त मार्ग असू द्या रुंद ।
नाक दाबून तोंड उघडा
नाहीतर खात बसा कंद ।
मार पडला की म्हणे
कोणीही होतो बेधुंद ।
पकडून त्याला मग
करा पूर्ण आपला छंद ।
नोटा घेताना कोऱ्या
डोळे थोडे ठेवा बंद ।
करप्शन च्या मुद्द्यावर
सगळेच होतात अंध ।
घेऊन बघा ना पैसे
मिळतो किती आनंद ।
पैसा कसाही असो
सारखाच असतो  गंध ।
ओंजळभर का होईना
करायचा असाच प्रबंध ।
आयुष्यभर मग आपले
लिहीत बसा निबंध ।
Sanjay R.


No comments: