Wednesday, July 1, 2020

" मी वारकरी "

घुमे टाळ चिपड्याचा नाद 
ताल मृदुन्गाचा हरिशी संवाद ।
तुजविण नाही कुणाची याद 
देई मज आज पंढरपूर साद ।

निघाले मन कराया वारी
आस दर्शनाची मी वारकरी ।
आभास विठुचा दिशा चारी
वाट पाहे भक्ता तुझी पंढरी ।

जपे मन हरी नाम वाणी
गुंजे गजर कानो कानी ।
विठ्ठला विना काय ध्यानी
आहे विठ्ठल माझ्या मनी ।
Sanjay R.

No comments: