Thursday, September 5, 2019

" गुरू ज्ञानाचा सागर "

करून शिक्षित सोडिले
गुरुजी तुम्हीच आम्हा ।
परिश्रम गुरूजी तुमचे
सांगू कसे मी तुम्हा ।

अ आ इ ई पासून
झाली विद्येची सुरुवात ।
पाठ जीवनाचे गिरवले
शिकलो सारेच तयात ।

गुरूंची महिमा अपार
ज्ञानाचा ते सागर ।
जमेल तितकी आम्ही
घेतली भरून घागर ।

जीवनाची केली मग
त्यातूनच वाटचाल ।
गाठले उद्दिष्ट आम्ही
नसतील जरी विशाल ।

करतो नमन गुरुवर
ऋणी मी तुमचा पामर ।
तुमच्याविना नाही सिद्धी
पडेल कसा तुमचा विसर ।
Sanjay R.

No comments: