Tuesday, February 26, 2019

" वेडा रे वेडा "

करायचं  काव्य
वाचायचा धडा ।
काढायची रांगोळी
त्यावर शेणाचा सडा ।
जायचं असतं हळू
धावतो तुफानी घोडा ।
जुळलेलं सारच
हातोडीनं तोडा ।
समुद्र भरायला
पाणी थेंब थेंब सोडा ।
अंथरुणात झोपतांना
घालायचा जोडा ।
सगळंच उलटं
कशाला चिडा ।
म्हातारपणीच नेमकं
पाप पुण्य फेडा ।
जीवनच हे
आयुष्याचा राडा ।
जोवर चालतो
दम लावून ओढा ।
पसरा हात
मिळतो पेढा ।
नसेल जगायचं तर
तिरडीवर पडा ।
देऊ लावून आग
संपेल तिढा ।
वेडा रे वेडा
कुणीही छेडा ।
Sanjay R.

No comments: