नकळत पडली तुझ्याशी गाठ
आठवणींनी हे भरले कपाट ।
दूर किती आलो कळलेच नाही
वाटतं आता का सरली ती वाट ।
केल्यात लाटा किती त्या पार
सुख दुःख पाठीशी शोधतो काठ ।
सरला दिवस आता रात्र सोबतीला
कळतं मलाही होणार नाही पहाट ।
Sanjay R.
पहिल्या पावसाचा किती आनंद
धराही होते भिजून कशी धुंद ।
अचानक अवतरतात ढग काळे
मधेच डोकावते आकाश निळे ।
थेंब थेंब जेव्हा बरसतो पाऊस
चिंब भिजून मग फिटते हौस ।
वृक्ष वेली संगे धरा होते आनंदी
दरवळ फुलतो हवा होते सुगंधी ।
Sanjay R.
चहाची तलफच भारी
छोटे मोठे त्याच्या आहारी ।
सकाळ होताच हवा कप भर
नाही तर डोके होते अधर ।
कुणाला गोड कुणाला फीक्का
चहा मात्र हवा एक कप पक्का ।
दुधाचा असो वा असो काळा
चहा विना तर सुकतो गळा ।
ऑफिस असो वा असू दे घर
येता जाता म्हणतो चहाच कर ।
पाहुणा असो वा असो मेहुणा
सहज म्हणतो थोडा थोडा घेऊना ।
काम काढायचा पण एकच मंत्र
चहा विना हो जमते कुठे तंत्र ।
कुठलेही संकट कुठलीही आपत्ती
चहाच घालवतो सारी विपत्ती ।
सगळ्याच गोष्टींवर चालेना हत्ती
गुणकारी किती या चहाची पत्ती ।
Sanjay R.