बघू किती मी वाट
रात्र सरली होईल पहाट ।
चांदण्याही सोबतीला
काय तो रात्रीचा थाट ।
तुझीच होती काय ती कमी
सोडू नको तू अशीच गाठ ।
आपला वाटतो हा एक काठ
येऊ देना सागरातही लाट ।
Sanjay R.
Friday, June 28, 2024
पहाट
पापणी ही ओली
धरून ओंजळीत माझ्या
फुले ही थकून गेली ।
टाकून ती मान खाली
चुरागळून किती गेली ।
गंध दरवळतो अजूनही
ओढ ती हृदयात गेली ।
अंतरात झाले तुकडे
भावनाच सरून गेली ।
आठवण येते या मनास
शोधतो मी तू कुठे गेली ।
नसतेस कुठेच तू तेव्हा
वाटते तू विसरून गेली ।
कधी येते उचकी क्षणात
वाटते याद तूच केली ।
मन होते मग अधीर
होते पापणी ही ओली ।
Sanjay R.
Thursday, June 27, 2024
कविता प्रकाशित
गोष्ट माणसाची
जो तो इथे घाईत
आहे कुणाकडे वेळ ।
अहोरात्र काबाड कष्ट
बसेना कशाचा मेळ।
उरलीच कुठे सवड आता
जीवनच झाले खेळ ।
भूक साठी चाले सारे
उठते पोटात कळ ।
सुख समाधान हरवले
करतो नुसती पळापळ ।
खणायचे ते कुठे काय
गवसेल का आता तळ ।
Sanjay R.
Thursday, June 20, 2024
छंद लागला
लागला का छंद मज
कळेना असते कुठे मन ।
आठवणीत तुझ्याच का
जाईना एकही क्षण ।
कधी नजर आकाशात
नी मोजतो एकेक तारा ।
वाटावं कुणालाही बघून
आताच बरसतील धारा ।
तहान भूक हरतो सारे
नसते शुद्ध कशाचीच ।
आभास होतात सारखे
खेळ चालतो मनाशीच ।
मधेच हसतो मनात
कधी होतो मी गंभीर ।
लागेना मन कशात
कधी होते ते अधीर ।
Sanjay R.