Sunday, April 23, 2023

हा आभास

लालसा या मनात
बघावे मन भरून ।
बोलावे इतके की
जावी रात्र सरून ।

बघावे डोळ्यात
त्यात मी दिसावा ।
शब्दात तुझ्या मी
क्षणो क्षणी असावा ।

स्वप्नांचा तुझ्याही
हवा मज आभास ।
त्यात तू आणि मी
व्हावे ऐक श्वास ।
Sanjay R.


कहर चोरीचा

रातच्यांन आले चोर
केला त्यायान कहर ।
आले चोरी कराले न
गेले पिऊन जहर ।

कपाशीवर माराले
औषिध होत ठीउन ।
काय झालं कोणास ठाव
थेच घेतल पिऊन ।

चढली असन गुंगी
रायले जागीच निजून ।
धरले लोकायन मंग
कहाडले चांगले शिजून ।

जन्मभर इसरणार नाही
लयच त्यायले झोडल ।
म्हणते नाव चोरीच हो
शपथ घेऊन सोडलं ।
Sanjay R.


संथ झाला आता श्वास

मनातले सारे माझ्या
गेले राहून मनात ।
पडला डोळ्यातून पाऊस
थेंब गळले आसवात ।

होती आस या मनात
प्रतीक्षा ही डोळ्यात  ।
गेल्या भावना सोडून
दाटला हुंदका गळ्यात ।

झाली दूर आता वाट
कुठे पडेल गाठ ।
अंधार झाला काळा कुट्ट
होईल कधी पहाट ।

काळोखात चाले नाच
भूत वसले डोक्यात ।
तुटले स्वप्न आता सारे
धूसर झाले क्षणात ।

मन लागले खाया
होते धडधड उरात ।
संथ झाले आता श्वास
कुठे प्राण या तनात ।
Sanjay R.


वाटी आणि ताट

जेवायला नाही तिथे
वाटी आणि ताट ।
संसाराची कुठे ती
जाते बघा वाट ।

बघून चुलीला कशी
विझली हो आग ।
भुकेल्या पोटाला मग
येतो किती राग ।

पैश्याविना भाजी
येईल कशी घरात ।
धान्याच्या बाजारात
गहू पण महाग ।

गाळून घाम सारा
जातो दिवस कष्टात ।
उपाश्या पोटी झोप
चोळती डोळे अंधारात ।

गरीबाची ही कथा
कसे ते जगतात ।
रक्ताचे होते पाणी
तरीही हसतात ।
Sanjay R.


आले कुठून हे आभाळ

आले कुठून हे आभाळ
सुर्याविनाच होते सकाळ ।
बसले रुसून कसे नारायण
वाटतो त्यांना हा छळ ।
मधेच येतात थेंब पावसाचे
वाहते पाणी खळ खळ ।
मधेच जातो बघून थोडा
येऊन वारा सळ सळ ।
Sanjay R.