झाली चूक एकदा
मिळाली माफी तेव्हा ।
परत परत होते चूक
माफी आता केव्हा केव्हा ।
नकोच ती चूक परत
सारेच आले आता सरत ।
चुकीला नको माफी
जगायचे फक्त हरत ।
Sanjay R.
झाली चूक एकदा
मिळाली माफी तेव्हा ।
परत परत होते चूक
माफी आता केव्हा केव्हा ।
नकोच ती चूक परत
सारेच आले आता सरत ।
चुकीला नको माफी
जगायचे फक्त हरत ।
Sanjay R.
चुकातून निघे मार्ग
गाठतो मीही स्वर्ग ।
नको घेऊ मनास लाऊन
मदतीला ते येतील धाऊन ।
जीवनाचा मार्ग जरी कठीण
घट्ट असावी नात्याची विण ।
नको कधीच तो दुरावा
आनंदात जगण्याचा पुरावा ।
चुकले कुठे सांग माझे
स्वप्न तर एकच माझे तुझे ।
Sanjay R.
तुझं माझं चा भाव
नकोच या मनात ।
देवाने दिले सारेच
आहे मीही रुणात ।
थोडे असेल कमी
नको तेच ध्यानात ।
आहे तेच तर खूप
जाईल कधी क्षणात ।
दुःख येईल जाईल
कधी अश्रू डोळ्यात ।
आनंद देशील देवा
आता या जीवनात ।
Sanjay R.
माझं माझं करणार किती
हवे पोटाला सांगा किती ।
घात करतो लोभ सारा
स्वार्था पुढे तर नाही भीती ।
घेऊन कोण जातो सांगा
बांधली मूठ तर होते रीती ।
Sanjay R.