तुझं माझं चा भाव
नकोच या मनात ।
देवाने दिले सारेच
आहे मीही रुणात ।
थोडे असेल कमी
नको तेच ध्यानात ।
आहे तेच तर खूप
जाईल कधी क्षणात ।
दुःख येईल जाईल
कधी अश्रू डोळ्यात ।
आनंद देशील देवा
आता या जीवनात ।
Sanjay R.
तुझं माझं चा भाव
नकोच या मनात ।
देवाने दिले सारेच
आहे मीही रुणात ।
थोडे असेल कमी
नको तेच ध्यानात ।
आहे तेच तर खूप
जाईल कधी क्षणात ।
दुःख येईल जाईल
कधी अश्रू डोळ्यात ।
आनंद देशील देवा
आता या जीवनात ।
Sanjay R.
माझं माझं करणार किती
हवे पोटाला सांगा किती ।
घात करतो लोभ सारा
स्वार्था पुढे तर नाही भीती ।
घेऊन कोण जातो सांगा
बांधली मूठ तर होते रीती ।
Sanjay R.
तू सांगशिल एक
करील मी दोन ।
सांगणार नाही तीन
पाळील मी मौन ।
असेल थोड माझ
बाकी सारं तुझ ।
त्यातच असेल सुख
तुझं आणि माझं ।
गुण गान तुझे
त्यातच आनंद ।
फुलेल मोगरा
दरवळेल सुगंध ।
Sanjay R.
जीवनाचा हाच नियम
थोड तुझ थोड माझं ।
नसेल जिथे काहीच
तिथे सांगा काय कुणाचं ।
पाऊल एक तुझे एक माझे
भवसागरही होतो पार ।
एकमेकांच्या साथीनेच
क्षण होतात कसे ते सार ।
Sanjay R.