फुलली प्रीत किती
तीही ऐक कहाणी ।
आनंदाचे क्षण सारे
होती तीच मेजवानी ।
सुखद तुझे बोल
शब्द घुमती कानी ।
सांग कसा विसरेल
जपून त्या आठवणी ।
कळेना मज काही
होते काय ते मनी ।
भाव नजरेतले तुझ्या
अंतरात तू मोहिनी ।
Sanjay R.
फुलली प्रीत किती
तीही ऐक कहाणी ।
आनंदाचे क्षण सारे
होती तीच मेजवानी ।
सुखद तुझे बोल
शब्द घुमती कानी ।
सांग कसा विसरेल
जपून त्या आठवणी ।
कळेना मज काही
होते काय ते मनी ।
भाव नजरेतले तुझ्या
अंतरात तू मोहिनी ।
Sanjay R.
कोण काय म्हणू मी तू
ती तशीच तर आहेस तू
मी मला का वाटते हवी तू
तुझ्यात तू आणि तशीच तू
कधी स्वप्नातआठवणीत तू
सांग शोधू कुठे मी आहेस तू
तू असेल जिथे नसेल कुठे
तरी आहेस या अंतरात तू
Sanjay R.
नको आता विचार
माणूस किती लाचार ।
माणुसकी तर सरली
उरला फक्त दुराचार ।
लालसा त्यास कशाची
उचलेना कशाचा भार ।
तुज हवा किती रे पैसा
करतो त्यासाठी तू वार ।
Sanjay R.
कशास हवा हो बोनस
कर्तव्याची नाही जाण ।
एका वर एक पाहिजे फ्री
तोच वाटते आम्हा मान ।
घेऊन घेऊन मिरवतो
त्यात कशाची आहे शान ।
Sanjay R.