नजरेला मिळता नजर
अंतरात होतो गजर ।
उठतात मनात विचार
क्षणात होतो मी हजर ।
Sanjay R.
Sunday, April 2, 2023
ट्याव ट्याव
तुझी नजर नी माझी माजर
नाही कशातच फरक ।
मिटून डोळे ते बघतात
जणू सांगतात तू सरक ।
घारे घारे डोळे कसे
गारगोटी जणू वाटतात ।
श्रीखंड असो वां आईस्क्रीम
चटकन कशा चाटतात ।
ऐक करते म्याव म्याव
दुसरी ची तर ट्याव ट्याव ।
शांती हवी हो मला
दूरच असा ना राव ।
Sanjay R.
चकवा
सारखा असतो फिरत
कुठे जायचे कळेना ।
जणू चकव्याने भुलवले
रस्ताच मज मिळेना ।
मनात जे माझ्या
काहीच कसे जुळेना ।
नको जे वाटते
तर तेही का टळेना ।
Sanjay R.
कधी जमलेच नाही
बिनधास्त असे ते वागणे
मला कधी जमलेच नाही ।
नेहमीच असते मनात धास्ती
स्वप्नात जगतो अगदी शाही ।
तेच ते जगणं तेच ते वागणं
जीवाची होते हो लाही लाही ।
देऊन आता सोडून सारे
रोज वाटते करायचे काही ।
Sanjay R.
थोडा विश्वास
सत्य नव्हे तो आभास
नको त्याचा चाले ध्यास ।
मनात फुलते भावना
होतो संथ मग श्वास ।
मन मात्र देते ग्वाही
म्हणे ठेव थोडा विश्वास ।
तोही क्षण येईल नक्की
सुटतील सारेच भास ।
अविरत तू चालत रहा
होतील सफल सारे प्रयास ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)