Sunday, April 2, 2023

कधी जमलेच नाही

बिनधास्त असे ते वागणे
मला कधी जमलेच नाही ।
नेहमीच असते मनात धास्ती
स्वप्नात जगतो अगदी शाही ।
तेच ते जगणं तेच ते वागणं
जीवाची होते हो लाही लाही ।
देऊन आता सोडून सारे
रोज वाटते करायचे काही ।
Sanjay R.


थोडा विश्वास

सत्य नव्हे तो आभास
नको त्याचा चाले ध्यास ।
मनात फुलते भावना
होतो संथ मग श्वास ।
मन मात्र देते ग्वाही
म्हणे ठेव थोडा विश्वास ।
तोही क्षण येईल नक्की
सुटतील सारेच भास ।
अविरत तू चालत रहा
होतील सफल सारे प्रयास ।
Sanjay R.


आधार

मनात एकच विचार
डोकावतो वारंवार ।
नाही त्याला सार
नाही कुठला आधार ।

कळेना काय प्रकार
होतो डोक्याला भार ।
हवा असतो होकार
पण मिळतो नकार ।

मन होते तार तार
अंतरात जणू प्रहार ।
निराशेची ती खाई
शब्द पडेना चकार ।

कशी ही व्यथा
कसा हा संसार ।
परत वाटते मग
हवाच एक आधार ।
Sanjay R.


बिनधास्त तुम्ही जगा

नको काळजी नको चिंता
थोडे धैर्याने तुम्ही वागा ।
जीवन हे सुंदर किती
बिनधास्त तुम्ही जगा ।
मोह माया नकोच आता
धरू प्रेमाचा एकच धागा ।
सुख दुःख येतील जातील
करू नका कशाचा त्रागा ।
Sanjay R.

मन जडले

ये मेरा दिवाना पन था की
कळत नकळत सारे घडले ।
नशिबाचाच खेळ सारा
कळलेच नाही कोण कुठे पडले ।
सगळीच झाली पागल पंती
पता नहीं घोडे कुठे अडले ।
डोळ्यात नाही अश्रू
पण म्हणतात सगळेच रडले ।
कुणास ठाऊक कसे ते
मन माझे तिच्यावर जडले ।
Sanjay R.