Saturday, April 1, 2023

कळत नकळत

कळत नकळत
कधी होतात चुका ।
किंमत चुकवायचा
मग असतो धोका ।
डोक्याला होतो ताप
कोणी बघतो मोका ।
सावरून मनाला
वेळीच टोका ।
Sanjay R.


समर्थन

आनाचारी अविचारी
काही कु प्रथाही इथे ।
परंपरा असेल जरी
नकोच समर्थन तिथे ।
Sanjay R.


जुन्या त्या परंपरा

जुन्या जरी त्या परंपरा
नका हो तुम्ही सोडू ।
पूर्वजांचा तर तोच ठेवा
जीवनात तोही जोडू ।

प्रगतीलाही हवी साथ
त्यातूनच साधेल हीत ।
परंपरांचा करा आदर
होईल तुमचीच जित ।

पुढे पुढे जातानाही
वळून मागे थोडे बघा ।
सापडेल जीवनाचा अर्थ
सुख आनंदाने जगा ।
Sanjay R.


परंपरा

जीवनात हवा
परंपरेचा साज ।
आयुष्याला येतो
समृद्धीचा बाज ।
Sanjay R.


ओढली काळोखाची शाल

सूर्य येताच मावळतीला
नभही झालेत लाल ।
आकाशही झाले निवांत
ओढली काळोखाची शाल ।

व्रुक्ष वेलीही स्थिरावले
परतले पक्षी घरट्यात ।
वारा झाला शांत जरा
चांदण्या चमकल्या अंगणात ।

रात राणीस आला बहर
दरवळला सुगंध चोहीकडे ।
सुखावला चंद्र जरासा
हळूच हसला बघून धरेकडे ।
Sanjay R.