रंगांच्या त्या धुळकणात
शोधत होतो मी तुला ।
कुठे गुलाबी कुठे हिरवा
उधळून सारेच नव रंग
रंगात बघायचे होते तुला ।
गोड स्मित हास्य तुझे
त्यात हसायचे होते मला ।
हळूच मग वाऱ्यासंगे
झुलायचे होते मला ।
Sanjay R.
Wednesday, March 8, 2023
नऊ रंग
नारी शक्ती
तलवार जिच्या हाती
ती झाशीची राणी
बघून तिचा प्रताप
शत्रूही मागे पाणी ।
कमी नका हो समजू
आहे ही भारतीय नारी ।
स्वबळावर ती जागवते
आहे पुरुषावर ही भारी ।
घर चालविणे सोपे नाही
तिला ज्ञान आहे सर्वस्वाचे ।
त्याग तिचा कळला कुणा
साधते हित ती जीवनाचे ।
माया ममता प्रेम मनी
बरोबरी ही करेल कोणी ।
नारी शक्ती जाणा जरा
हवा सन्मान तिचा मनोमनी ।
Sanjay R.
Sunday, March 5, 2023
नको तेच घडतं
मनासारखं कुठे कधी घडतं
मांजर जातं आडवं
आणि विपरीत सारं घडतं ।
मनात असतेच धाक धुक
वाटतं सुरळीत व्हाव सारं
पण नशिबात नसेल तर
नेमक नको तेच घडतं ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)