Thursday, December 22, 2022

बाबांचा मार

अडबड झाली गडबड झाली
आईने दिला मज धपाटा  ।
लक्ष देऊन आता करतो सारे
तरी होतो कसा चुकांचा सपाटा ।

अभ्यासात नाही लागत लक्ष
मित्रच दिसतात हो पुस्तकात ।
कितीही वाचा थांबत नाही
जातच नाही काही या मस्तकात ।

इकडे तिकडे फक्त बघत असतो
अभ्यासाचा येतो कंटाळा खूप ।
टिफीन उघडुन बघत राहतो
आईने दिले की नाही ते तूप ।

कळतच नाही काय लिहावे
परीक्षेचे प्रश्न असतात किती भारी ।
बरी वाटते मला नेहमीच कशी
मित्रांसोबत होते ती मारामारी ।

आज लागला रीझल्ट परीक्षेचा
सगळीकडे नुसता आहे भोपळा ।
आता आई बाबांना सांगू मी काय
दिसतो बाबांच्या हातात ठोकळा ।
Sanjay R.

स्वप्न माझे मोठे

मनात एकच ध्यास
आहे घडवायचा इतिहास ।
बोबडे बोल हे माझे
ठेवा थोडा विश्वास ।

परिश्रम करील मी सारे
पडणार नाही मागे ।
जे स्वप्न आई बाबांचे
करील त्यास मी जागे ।

शूर वीर म्हणा मज
लहान मी हो कुठे ।
मीही बघतो स्वप्न
व्हायचे मज मोठे ।
Sanjay R.


जीवनाची साथ

जीवनाची ही बात
मिळते ऐक साथ ।
एकमेकासी आधार
करायचा पुढे हात ।
संकटे येती भारी
करायची त्यावर मात ।
जीवनाचे गीत हे
जायचे पुढे गात ।
बघा जरा करून
जीवनाची सुरूवात ।
Sanjay R.


Wednesday, December 21, 2022

सांग ना रे देवा

शोधू कुठे मी तुजला 
तूच सांग ना रे देवा ।
मनात आहे रे भाव 
हा तुझाच आहे ठेवा ।

हात दोन्ही मी जोडून
करतो रे तुझी भक्ती ।
उपसतो कष्ट  सारे
आहे तुझीच रे शक्ती ।

दोन वेळ पोटभर
मिळते मज भाकरी ।
जातो थकून भागून
निजतो नाही साथरी ।

भाव तुझा या मनात
नाम तुझे सदा मुखी ।
नाही मागणार काही
ठेवतो तू मज सुखी ।

होऊ दे कल्याण सारे
तुझ्या चरणी दे जागा ।
दुःख देते आठवण
तो तुझ्या माझ्यात धागा ।

भेट हवी मज आता
करीन तुझी मी वारी ।
सदा ठेव मज असा
येईल मी तुझ्या द्वारी ।

संजय रोंघे
नागपूर

Wednesday, December 14, 2022

असते तू नसते

असते तू नसते
मला मात्र दिसते ।

नजर चोरून बघते
तशीच गालात हसते ।

दूर कुठे तू असते
हृदयात माझ्या वसते ।

जेव्हा तू रुसते
हवी हवी वाटते ।

रागावली की मात्र
गळा माझा दाटते ।

तू सदा बोलावं
नी मी ऐकावं वाटते ।

अबोल असताना तू
डोळ्यात बघावं वाटते ।

स्वप्न जेव्हा बघतो
त्यातही तू असते ।

मनच नाही लागत
जेव्हा तू नसते ।
Sanjay R.