Monday, November 21, 2022

संधी

मिळते कुठे परत परत
संधी चे करावे सोने ।
डोक्यात नको विचार
द्यावे सोडून जुने ।
Sanjay R.


असा कसा रे माणूस

असा कसा रे देवा
तू बनविला माणूस ।
लोभी लबाड किती
चांगला कसा म्हणुस ।

अंतरात त्याच्या क्रोध
जसा जळता निखारा ।
नाही त्यास थोडे मन
वाटे कोराच चुकारा ।

कळेना काय मनात
नारीचा नाही त्यास मान ।
सदा दिसे विचारात
करी स्वतःचा अभिमान ।

मन त्याचे किती कठोर
आवाजात त्याच्या दहाड ।
कष्टाला नाही येत मागे
फोडतो दगडाचा पहाड ।

असेल कुऱ्हा जर मनात
तर जुळेना त्याची नाळ ।
देऊनी साऱ्यासी आधार
करतो घराचा सांभाळ ।

बाप म्हणून मिरवण्या
झेलतो किती तो प्रहार ।
माणसासारखा माणूस
नाही कधी मानत हार ।

डोळ्यात नाही अश्रू
दणकट त्याची छाती ।
मावळ तो होतो जेव्हा
काय उरते त्याच्या हाती ।

शब्दाला देतो तो मान
पाळतो देऊनही प्राण ।
मिळेल कुठे असा माणूस
खोदा किती जरी खाण ।
Sanjay R.


चला गाऊ अभंग

चला गाऊ अभंग
मन होईल हो दंग
विठ्ठल नमाचा गजर
भक्तीचा तिथे रंग ।
सोबतीला वाजे जसा
तालावरती मृदुंग ।
भास होतो जणू
हरी आहे संग संग ।
चला गाऊ अभंग
मन होईल हो दंग ।
Sanjay R.


पूर्ण करील मी स्वप्न तुझे

आई करील मी पूर्ण
सांग काय स्वप्न तुझे ।
आहे माझे एकच स्वप्न
प्रेम हवे मज तेच तुझे

लहानाचे मोठे करण्या
विसरलीस तू तुझे स्वप्न ।
चिंतेत माझ्या सदा होतीस
राहिलं ग स्वतःला जपणं ।

झेलल्या तू हाल अपेष्टा
रात्रीही जागून काढल्या ।
खाणे पिणे शिक्षण माझे
इच्छा साऱ्या तू सोडल्या ।

तुझ्यामुळेच झालो मोठा
सरले आता तुझे ते कष्ट ।
बघ शांतीने तू जग सारे
होऊ नकोस मजवर रुष्ट ।

तुझ्याविना मी होईल पोरका
सोडू नकोस मज क्षणभर ।
हवा मला ग तुझाच आधार
ऋण तुझेच आहे मजवर ।
Sanjay R.


आईचा धावा

आईचे असे एकच स्वप्न
बाळ व्हावे मोठे लवकर ।
शिक्षणात त्याचा नंबर यावा
नोकरीतही रुबाब मिळावा ।
म्हातारपण मग सुखात जावे
सुन बाईने पण मान द्यावा ।
सुखासाठी ती करते धावा
मुलाला सुखात राहू दे देवा ।
Sanjay R.