Monday, September 26, 2022

कर्तव्याची जाण

कर्तव्याची असता जाण
कामाची असे कुठे वाण ।
थकून भागून येता घरी
घरातही हो मिळतो मान ।
Sanjay R.


आभार

मानतो मी आभार
केला चुकीचा स्वीकार ।
स्वप्न नव्हते माझे
झाले तरी साकार ।
ठरवलेच कुठे काही
नव्हता कशाला आकार ।
कळेचना काय हे
कुठला हा प्रकार ।
गुंतलो विचारात जर
सारे झालेची बेकार ।
चुकीला माफी नाही
मानतो मी आभार ।
Sanjay R.


अमावसेचा साज

भरून आकाश ढगांनी
सूर्य वेढला त्यात ।
दिसेना आहे कुठे तो
दिली सावलीने साथ ।

वारा थोडासा गार
नाही पावसाची धार ।
वाहे इकडून तिकडे
होऊन झाडावरती स्वार ।

मधेच जातो डोकावून
रवी राज त्या नभातून ।
सायंकाळ होत आली
हसेल चांदणी गालातून ।

मैफलीत नसेल चन्द्र
अमावसेचा दिवस आज ।
होईल उदास मग चांदणी
देईल रात्रीला तिचा साज ।
Sanjay R.


Saturday, September 24, 2022

राहिले अजून बाकी

नको ते घडले
झाली मोठी चूक
जीव धडधडतो
होते धुक धुक ।

कसे कुणास ठाऊक
कसे काय घडले ।
रस्ताच चुकलो नि
काम सारे अडले ।

प्रत फिरायचे आता
तेही हाती न उरले ।
जीवनाच्या शेवटाला
दिवसच किती उरले ।

राहिले अजून बाकी
खूप होते करायचे ।
जगू द्या अजून जरा
नाही आत्ताच मरायचे ।

पाहता पाहता गेले दिवस
काहीच न कळले ।
मनातले विचार सारे
मनातच हो जाळले ।
Sanjay R.


तेच अस्त्र

चला काढू या
विशेष शस्त्र ।
अंतिम क्षणाला
तेच तर अस्त्र ।

नसतो इलाज
शेवटचा पर्याय ।
यश अपयश
कशाचे काय ।

होताच संघर्ष
काय परिणाम ।
डोळ्यात अश्रू
नाही विश्राम ।
Sanjay R.