Saturday, August 20, 2022

गपाड्या

गपाड्याना हव्या गोष्टी
चूप त्यांना बसवत नाही ।
सारखी असते टकळी सुरू
शेंडा ना बुड विषय असो काही ।
स्वतःच बोलून हसतात मग
कोणी हसो किव्वा नाही ।
Sanjay R.


Friday, August 19, 2022

नटखट मुरारी

निघाल्या गोपिका
यमुनेच्या तीरी ।
शोधती साऱ्या
कुठे तो श्री हरी ।
बाळ तो गोपाळ
बसून झाडावरी ।
बघतो तिथून
कसा भिरीभिरी ।
झाली राधा उदास
कन्हा येईना तरी ।
हळूच उठले सूर
वाजली बासरी ।
राधा शोधते मुरली
झाला आनंद भारी ।
दिसेना कन्हैय्या
शोधे दिशा चारी ।
झाडावर गवसला
नटखट मुरारी ।
Sanjay R.

डोक्यातला गोंधळ

डोक्यात विचारांचा गोंधळ ।
लिहायला घेताच
शब्दांची होते पळापळ ।
कशाला कशाचा नसतो ताळमेळ ।
वाटतं मग याहून तर बरी भेळ ।
साराच चालतो खेळ ।
लिहायला लागतो पण वेळ ।
शेवटी अवतरते जेव्हा लिखाण
मनाशी मनाचा होतो मेळ ।
कधी आसवांचा दिसतो छळ ।
कधी आनंद देते बळ ।
आणि होते अंतरात खळखळ ।
Sanjay R.



जीवनाचा अर्थ

कळेल जेव्हा जीवनाचा अर्थ
होईल तेव्हाच जीवन सार्थ ।

हवेत विचार सर्वस्वी निस्वार्थ
थोडा तर हवाच हो परमार्थ ।

अंधश्रद्धेला तर नाहीच अर्थ
पिउच नका हो तसले तीर्थ  ।
Sanjay R.

Thursday, August 18, 2022

कर्तव्याची दिली याद

अर्जुन झाला दुःखी
युद्धभूमीवर होता नाद ।
कृष्ण सारथी पार्थाचा
ऐकेना कुणाची साद ।
अर्जुनास सांगुन गीता
कर्तव्याची दिली याद ।
झाले मग महायुद्ध
शंभर कौरव झाले बाद ।
झाला अन्यायाचा पराजय
सत्याची विजयी दाद ।
Sanjay R.