माझा देश
माझा अभिमान ।
घरोघरी तिरंगा
तोच त्याचा सम्मान ।
रंग तीन त्याचे
किती त्याची शान ।
प्रेरणा स्रोत आमचा
आम्हासाठी महान ।
तिरंगा आमची आहे
आन बान शान ।
Sanjay R.
Monday, August 15, 2022
माझा देश माझा तिरंगा
Sunday, August 14, 2022
खळखळ
पानांची सळसळ
नदीत खळखळ ।
हळूच होते
कशी ही हळहळ ।
सोसतो मी कळ
उसने बळ ।
का कूणास ठाऊक
लागली झळ ।
वाटते मज
सगळेच अटळ ।
होते मळमळ
किती हा छळ ।
Sanjay R.
मनाचा छळ
कशास म्हणू मी खेळ
सांगून येते कुठे वेळ ।
नियतीस जे मान्य
घडतो तसाच मेळ ।
चालेना कुणाचे काही
होतो मनाचा छळ ।
घडते तेच सार
असते ते अटळ ।
Sanjay R.
नियतीचा खेळ
नियती ठरवते सारे
मनाचे कुठे चालते ।
कितीही ठरवा तुम्ही
व्हायचे तेच होते ।
म्हणतो मी मी कोणी
काय त्याचे उरते ।
सोडून जातो सारे
मित्व जेव्हा सरते ।
खेळ नियतीचा सारा
वेळ अचानक येते ।
असेल नसेल सारे
प्रवाहात घेऊन जाते ।
Sanjay R.
Saturday, August 13, 2022
वाजतात बारा
होते किती चिडचिड
आली नाही ती तर ।
डोंगर कष्टाचा समोर
आठवते माहेर सासर ।
चंदा आसो वा मंदा
आवरते पसारा सारा ।
नाही आली तर मात्र
म्याडमचा भडकतो पारा ।
घरात सारे असतात चूप
कळतो साऱ्यांना इशारा ।
कामवाली नसली तर
घरात वाजतात बारा ।
Sanjay R.