माझ्या कविता - By Sanjay Ronghe
शब्दांना जुळती शब्द चार ओळींची कविता ।
आयुष्यच पडे अपुरे संपेना लिहिता लिहिता ।
रोज सूर्याची असे साक्ष रात्री चांदण्यांची सरिता ।
सुखदुखाच्या आठवणी अंतरात जणू ती गीता ।
अर्थाचे कधी होती अनर्थ घडे त्यातून मग कथा ।
पुसून डोळ्यातली आसवे मिटते कुठली व्यथा । Sanjay R.