सांगतो मी कथा माणुसकीची, लक्ष देऊन ऐका.
माणसातच असते ना माणुसकी, मग का माणूसच देतो माणसाला धोका.
स्वार्थाने केले घर मनात, भरायचा असतो तो रिकामा खोका .
पैश्या विना होते काय, हवे ते घ्यायला पैसा तुम्ही फेका .
महागाईने तर केला कहर, जीवन आता जगणेच आहे मोठा धोका .
मागे पडला तो गेला, जीवनाचा मंत्र हाच शिका.
कोण बघेल तुमच्याकडे, राहाल तसेच मग भिका.
जगायचे तर मान उंच हवी, सांगेल कोण शिका.
चला पुढे, पुढेच जायचे, विचार जास्त करू नका.
मार्ग आहे खडतर थोडा, येतील धोंडे मधे मधे,
ओझे आहे संस्कारांचे, उलटून ते फेका.
धीर नको, गंभीर व्हा. आक्रमकताही हवी थोडी.
क्रोध मोह मत्सर हवा टाकायचा तुम्हास डाका .
बेशरमकी तर हवीच हवी, दुर्गुणांना जरा जपा.
लाज नको, शरम नको, उर्मट होऊन टेका .
शरीरात आहे रक्त लाल, त्याचा कुठला धोका.
थोडे जरी सांडले तरी रंग पडेल कसा फिका .
अस्त्र असो वा शस्त्र असो, लढताना तर हवेच सारे. धीट व्हा, निग्रही व्हा, काळीज काढून फेका .
काय हवे काय नको, सारेच तुम्ही लुटा.
उठा सारे जागे व्हा. मागे असे राहू नका .
आईस्क्रीम तुमच्याच हातात आहे. बघा तुम्ही चाखा.
Sanjay R.