Thursday, November 25, 2021

विचारांचे ओझे

मनाच्या अडगळीत दडले काय
ढीग विचारांचा करू मी काय ।

मनात आहे जे जे आता
आठवते सारेच जाता येता ।

फुलतो मनात कधी आनंद ।
दुःखही सारेच हृदयात बंद ।

कधी वाटते नकोच काही
लुप्त होतात दिशाही दाही ।

जीवनाची तर हीच दशा 
कधी चढते कशाचीही नशा । 

अबोल होते कधी मन माझे ।
फिरतो घेऊन सारेच ओझे ।
Sanjay R.


Wednesday, November 24, 2021

मन झाले शांत

मन झाले शांत
वाटे मज निवांत ।

विचार नाही काही
आता कसली खंत

नाही कशाची आशा
पाहू नकोस अंत ।

पदरात सदा निराशा
होईल मोठा ग्रंथ ।

चरणी ठेवितो माथा

पाव तूची एकदंत ।

तूच सर्व ज्ञाता
आहे तूच अनंत ।
Sanjay R.




जळते पणती

मनच झाले हे वादळ वारा
शमवू कसे कुठे किनारा ।

शांत करण्या हवा एकांत
सागर कधी का होतो शांत ।

लाटे वरती येईल लाट
नेई सारेच समुद्र अफाट ।

हवी मजला थोडी शांती
मिळेल केव्हा जळते पणती ।
Sanjay R.


Tuesday, November 23, 2021

गर्दी

विचारांची होते गर्दी
मोजू कसे त्यात दर्दी
पडतात मग स्वप्न सारे
जातो विसरून ती अर्धी ।
सांगू कुणास खरेखोटे
देऊ कुणास मीही वर्दी ।
पाश सारे गुंतले पायात
जीवनाची ही वाट अर्धी ।
उरले सुरले मनात सारे
सोसवत नाही अफाट गर्दी ।
Sanjay R.


स्वप्न मनातली

होतील कशी पूर्ण
स्वप्न या मनातली ।
निशे सवे जातील दूर
सत्यकथा आयुष्यतली ।
तळपतो जरी सूर्य
काय जादू ढगातली ।
धो धो पडतो पाऊस
शक्ती सांगा कुणातली ।
नको गर्दी अपेक्षांची
धुळमाती विचारतली ।
हसू खेळू थोडे आता
बघू गम्मत जीवनातली ।
Sanjay R.