नको कलह नको वाद
नकोसा असतो तो नाद ।
मनात असते नेहमीच आस
प्रेमाला हवी फक्त साद ।
थोडेच घ्या थोडेच द्या
नेहमीच मिळेल मग दाद ।
Sanjay R.
किती बांधायचे कयास
पडतात कमीच प्रयास ।
मनात सारखा ध्यास
मग होतात आभास ।
कधी थांबतात श्वास
निघतो सुटकेचा निश्वास ।
नकोच आता कयास
नकोत कुठले प्रयास ।
मनी देवाचीच ध्यास
थांबेवरी हे श्वास ।
Sanjay R.
तुझी माझी एकच वाट
दूर जाते ही पाऊलवाट ।
मधेच लागे खाच खळगे
येतील कडी उंच उंच घाट ।
नागमोडी ते वळणे किती
झाडे झुडपे लागती दाट ।
मधेच वाहे झुळझुळ पाणी
तुडुंब भरलेत सारेच पाट ।
जीवन आपुले असेच आहे
न सरणारी पाऊलवाट ।
Sanjay R.