Monday, September 27, 2021
" येणार किती तू पावसा "
" काय माझा अपराध "
सांग मला शेवटचे
काय माझा अपराध ।
प्रश्न अजूनही आहे
करू नको मज बाद ।
टाक बोलून एकदा
सांग कशाचा हा वाद ।
दूर किती मी एकाकी
घेते अजूनही साद ।
शब्द हवा मज तुझा
ऐकण्या आतुर नाद ।
राहू नकोस तू चूप
कोण रे इथे आजाद ।
ये परतून तू असा
वाटे रिकामा प्रासाद ।
अनमोल हे जीवन
घेऊ जगण्याचा स्वाद ।
Sanjay R.
Sunday, September 26, 2021
" मनात चाले काय "
चाले मनात काय काय
त्यातले किती सुविचार ।
अखंड चालली परिक्रमा
मन करी तयाचा प्रचार ।
नको नको त्या आठवणी
आणि बुद्धी होते लाचार ।
कधी मी मी चाच भाव
अंगात शक्तीचा संचार ।
पदरात येई कधी मग
आपलाच धिक्कार ।
नको वाटे मज आता
काही कशाचे विचार ।
Saturday, September 25, 2021
" जपायचं सारं अंतरात "
वेळ लागतो थोडा
काही मिळवायला ।
मन असेल ते तर
त्यालाही ओळखायला ।
क्षणही असतो अपुरा
सर्वस्व गमवायला ।
नातं असो वा वस्तू
नको कधी हरवायला ।
जपायचं सारं अंतरात
पुरेल जन्मभर जगायला ।
Sanjay R.
Friday, September 24, 2021
" मन कुणावर जडते "
सारंच काही अडते
जेव्हा मन कुणावर जडते ।
सांगून कुठे काय होते
नकळतच सारे घडते ।
विसर पडतो सारा
मिळता प्रेमाची साथ ।
सुचेना काही कशाचे
सदा मन असते गात ।
प्रीतीची तऱ्हाच वेगळी
ऐकेना मन मनाचे ।
विचार असे फक्त एकच
करू काय या मनाचे ।
Sanjay R.