Thursday, September 16, 2021

" चहा कॉफी कामाची "

चहा कॉफी किती कामाची
किमतीला कमी दामाची ।
थकला असो वा भागला
बुटी जणू किती कामाची ।

मैत्री असो वा नाते असो
घट्ट मिठी तिच्या स्वादाची ।
आठवण येता हवीच वाटे
दुनिया सारी तिच्या नादाची ।

वेळ असो वा नसो कुणाला
देई फुरसत काही क्षणाची ।
गोडवा तर इतका तिचा
मिटवते दरी दोन मनाची ।
Sanjay R.



Wednesday, September 15, 2021

" किरण एक आशेचा "

नको ते विपरीत सारे
का हे असे घडते ।
सांभाळायचे  मन कसे
जाऊन तिथेच जडते ।

आठवणींचा डोंगर विशाल
करू किती मी पालथा ।
त्राणच उरले नाहीत
एकट्याने येईल का चालता ।

क्षणनी क्षण अवघड  किती
डोळे असतात वाटेवर ।
थांबत नाही एक थेंब
जणू लाटच येते गालावर ।

हुंदकाही कुठे आवरतो
आवेग दुःखाचा सोसेना ।
तुझ्याविना जगू कसे
काहीच मजला सुचेना ।

ये परत तू सोडून सारे
नको विचार कशाचा ।
रोज बघतो सूर्य नवा
हवा किरण एक आशेचा ।
Sanjay R.


Tuesday, September 14, 2021

" काळा कुट्ट अंधार "

गर्द काळा कुट्ट अंधार
अवजड आयुष्याचा भार ।

मनात असंख्य विचार 
कठीण जीवनाचा पार ।

शोधतो घडीभर आधार 
तोही मिळेना मी लाचार ।
Sanjay R.


Monday, September 13, 2021

" दिसे मृगजळ जेथे "

ही वाट कुठे जाते
दिसे मृगजळ जेथे ।
अविरत सावरे भार
पडते पाऊल तेथे ।
वाटे पहुडली निश्चिन्त
ताप उन्हाचा सोसते ।

कोसळतो पाऊस जेव्हा
पाण्यासही वाट देते  ।
रात्रीलाही असते तत्पर
हवे तिथे ती घेऊन जाते ।

जंगल दरी वा असो खोरे
जाई पुढेच कधी न सरते ।
धोंडे दगड येई मधेच
तरी कधीही ती न हरते ।
Sanjay र.

Sunday, September 12, 2021

" कसे असते हे प्रेम "

सांगेल का कोणी मला
कसे असते हे प्रेम ।
एकदा जुळले की मग
कशाचाच नसतो नेम ।

सुचेना काही कशाचे
घेईतसे मन सदा धाव ।
हवे हवे वाटे  सारेच
मनि फक्त प्रेमाची हाव ।

तहान भूकही हरते सारी
विचार फक्त असतो एक ।
प्रेमासाठी काहीही करेल
चाले मनात तोच आलेख ।
Sanjay R.