देईल तुला म्हणून मी आता
काय करावं तो विचार करतो ।
ठेवलं आहे मी जपून काही
ते सारच मी आता तुलाच देतो ।
आवडेल नावडेल विचारच नाही
हास्य चेहऱ्यावरचेच मी आठवतो ।
येऊ देना परत तेच तसेच दिवस
आठवून सारे मी मलाच हसवतो ।
Sanjay R.
नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही
असते काही अटळ ।
विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.
वर्ष झाले दोन
होत नाही वारी ।
विठोबाचे भक्त
हिरमुसून घरी ।
दर्शनाची ओढ
माऊलीच्या दारी ।
दिस आले कसे
पडतात भारी ।
नामाचा जयघोष
नाही आता कानी ।
पावले जखडून
केले काय कोनी ।
क्षणोक्षणी विठ्ठल
येतो माझ्या ध्यानी ।
विचार नाही दुसरा
येत आता मनी ।
भिजले डोळे आता
किती येतील सरी ।
दर्शनाचा भुकेला
शोधतो दिशा चारी ।
दिसते स्वप्नात
विठोबाची पंढरी ।
मुखी घोष नामाचा
म्हणतो हरी हरी ।
Sanjay R.