नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही
असते काही अटळ ।
विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.
नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही
असते काही अटळ ।
विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.
वर्ष झाले दोन
होत नाही वारी ।
विठोबाचे भक्त
हिरमुसून घरी ।
दर्शनाची ओढ
माऊलीच्या दारी ।
दिस आले कसे
पडतात भारी ।
नामाचा जयघोष
नाही आता कानी ।
पावले जखडून
केले काय कोनी ।
क्षणोक्षणी विठ्ठल
येतो माझ्या ध्यानी ।
विचार नाही दुसरा
येत आता मनी ।
भिजले डोळे आता
किती येतील सरी ।
दर्शनाचा भुकेला
शोधतो दिशा चारी ।
दिसते स्वप्नात
विठोबाची पंढरी ।
मुखी घोष नामाचा
म्हणतो हरी हरी ।
Sanjay R.
माणूस गुलाम या सवयीचा
स्वस्थ कसा तो बसेल ।
शोध घेतो हवे मग त्याचा
जवळ ते जर नसेल ।
कशाचीच मग नसते परवा
सामना संकटाशीही करेल ।
हवे म्हणजे हवेच असते
म्हणतो तुझ्या विना मी मरेल ।
क्षणोक्षणी असे तोच विचार
काय आयुष्य असच सरेल ।
जीवनाचा तर रंगच न्यारा
कोण जिंकेल कोण हरेल ।
Sanjay R.
काखेत कळसा गावाला वळसा
म्हण सांगते काही नाही ते खोटं ।
कळलं कसं नाही, जवळ होतं सारं
हाव किती मजला मन किती छोटं ।
असेल त्याला जपा, नको ते सारा
विचार हवा थोडा मन हवं मोठं ।
Sanjay R.