Saturday, July 17, 2021

" हे तर सगळं चालायचं "

जीवनात किती चालायचं
कुठेतरी आहे थांबायचं ।

नाही अंतच या वाटेला
अविरत पुढे पुढे जायचं ।

विचारच नको कशाचा
होऊ दे ना जे जे व्हायचं ।

अडथळ्यांची आहे शर्यत
फिरून कशास बघायचं ।

आहेत पुढे खाच खळगे
त्यांनाही पार करायचं ।

सुख असो वा असो दुःख
हे तर सगळं चालायचं ।
Sanjay R.


Friday, July 16, 2021

" मनात माझ्याही काही "

मनात माझ्याही काही
शब्दच सुचत नाही ।
सुचेल ते लिहिण्यास
मग शोधतो मी वही ।
कधी आठवेना शब्द
पेन तिथे वाट पाही ।
प्रतीक्षा असे शब्दाची
शोधतो मी दिशा दाही ।
उतरता एक काव्य
आनंदात व्यथा काही ।
Sanjay R.



Thursday, July 15, 2021

" भावनांचे घर मनात "

भावनांचे घर मनात
रूप बदले एक क्षणात ।
वदे वाचा बोल काही
कार्य करणे असे हातात ।

उचले ना जेव्हा हात
प्रश्न होई काय या मनात ।
मनच जाणे उत्तर त्याचे
बदलू नकोस क्षणा क्षणात ।
Sanjay R.


Wednesday, July 14, 2021

" काटेरी वाट "

वाट बघायला तूझी
मज तू लावू नकोस ।
घाव मनाला या असे
परत पुन्हा तू देवू नकोस ।

वेदना या माझ्या मनाच्या
तू  तुझ्यात घेऊ नकोस ।
साधना किती या अंतराची
अजाण तू जाणू नकोस ।

तपश्चर्येच्या वणव्यात
मलाच तू जाळू नकोस ।
नाही होणार राख शांत
हात स्वतःचे पोळू नकोस ।

असेल अग्नी तो साक्षीला
साक्ष माझी तू मागू नकोस ।
अश्रूंचीही सरली बरसात
अजून मजला रडवू नकोस ।

हो सुखी तू तुझ्या दारी
परत वाट ही धरू नकोस ।
वाटेवरती काटे अंथरले
कट्यामधून तू चालू नकोस ।
Sanjay R.

Tuesday, July 13, 2021

" थांबून नको पाहू "

थांबून नको पाहू
सांग मी कसा राहू ।

दूर जाते ही वाट
मधेच उंच घाट  ।

उंचच उंच वृक्ष
देऊ कुठे मी लक्ष ।

पक्षांची किलबिल 
डबडबले झिल ।

रिमझीम पाऊस
भागली माझी हौस ।

मस्तीत हा  नजारा 
धुंदीत होता वारा ।

तृप्त झालेत नेत्र 
भिजले माझे वस्त्र ।

निसर्गाची किमया 
जीवनाचा हा पाया ।
Sanjay R.