कसा खेळ हा लपाछपीचा
होते चुकामुक दोष कुणाचा ।
विलंब होतो थोड्या क्षणाचा
छळ होतो निर्दोश मनाचा ।
हवा घडीभर वेळ सुखाचा ।
नको लवलेश त्यात दुःखाचा ।
जीवनात ऊन पाऊस कधी वारा
आसरा मज आहे सावलीचा ।
Sanjay R.
Saturday, June 26, 2021
" खेळ हा लपाछपीचा "
Friday, June 25, 2021
" भावनांचा खेळ सारा "
भावनांचाच खेळ सारा
विचारांचा झुलतो वारा ।
काय येईल मनात केव्हा
मधेच चमकून जातो तारा ।
सहजच मग आठवण येते
धुंद होतो प्रकाश सारा ।
आठवणीच कधी देती दुःख
वाहे डोळ्यातून टपटप धारा ।
Sanjay R.
Thursday, June 24, 2021
" कसली ही लढाई "
अस्त्र नको, शस्त्र नको
कशी ही लढाई ।
पैशाच्या बळावर
मारायची नुसती बढाई ।
निर्बल बघून सारे
करतात मग चढाई ।
निरपराधी जातात बळी
म्हणे कोण कुणाचा भाई ।
नाव किती गाव किती
वाळत नाही शाई ।
खबरे मागून खबर येते
जातो जीव त्राही ।
विचारांना थारा कुठे
सारे उचलतात बाही ।
रक्त गळते डोळ्यावाटे
पुसायला कोणी नाही ।
मनातच उठतात ज्वाला
होते लाही लाही ।
दूर निपचित पडले प्रेत
बघते दिशा दाही ।
हरलो जिंकलो वाद कुठला
मी जगतो शाही ।
सांगू नका वरचढ कोण
कोण कुणाला पाही ।
Sanjay R.
" ऋणानुबंध "
तुझ्या माझ्या नात्यात
एक अनोखा बंध ।
दरवळतो जीवनात
प्रीतीचा सुगंध ।
क्षण नि क्षण फुलतो
दरवळतो सुगंध ।
दुःख होते दूर आणि
मिळतो आनंद ।
हसवायचे तुला कसे
चाले त्याचा प्रबंध ।
बघायचे हास्य तुझे
लागला मज छंद ।
अंतरात बघ माझ्या
असतो तुझ्यात धुंद ।
जन्मोजन्मी असू दे
असाच ऋणानुबंध ।
Sanjay R.
Wednesday, June 23, 2021
" कसे ऋण फेडावे "
कसे हे ऋण फेडावे
आयुष्य परत जोडावे ।
पडला विसर तो कसा
का आपल्यात हे घडावे ।
तू सागर प्रेमाचा अथांग
वाटे मज त्यात डुबावे ।
होऊन तुझाच भक्त परत
अंतरात तुझ्या मग शिरावे ।
तुजविण कोण मोठा इथे
वाटे भक्तीत तुझ्या जगावे ।
नाम तुझेच घेता घेता
डोळे शेवटचे मग मिटावे ।
कर्ताही तू करविताही तू
तुजविण मी कसे जगावे ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)