Wednesday, June 3, 2020

" झोप सुखाची "

उडून गेली दूर कुठे
झोप ही सुखाची ।
मिटून मी डोळे बघतो
वाट सांगू कुणाची ।

मन येते फिरून सारे
आकाशात जितके तारे ।
दूर उडवून घेऊन जाते
उरात वादळ आणि वारे ।

स्वप्नांची तर वाट लागली
दिवसालाही काळोख वाटे ।
दिवस रात्र तर एकच जणू
आभास होता, टोचती काटे ।
Sanjay R.

Tuesday, June 2, 2020

" कसला हा अहंकार "

अरे अरे माणसा 
आहे तुझा धिक्कार
बाळगतोस तू कशाला 
हा असला अहंकार 

कसला रे तू माणूस
डोक्यावर कसला भार ।
विसरलास तू माणुसकी
जडला स्वार्थाचा आजार ।

बदलली वृत्ती तुझी
उरला कुठे विचार ।
हिंसेचे वेड खुळे
तोच तूझा आचार ।

तुझ्यापाई बघ इथे
जीव झाला बेजार ।
उत्सव विजयाचा कसा
आहे ही तुझी हार ।

मित्र नव्हे तू शत्रू झाला
काय जीवनाचा सार ।
जगणे मरणे एक झाले
उरला कुठे आधार ।
Sanjay R.

Monday, June 1, 2020

" खेळ भातुकलीचा "

लहान असेल मी
तेव्हाची ही वेळ ।
गम्मत जम्मत चाले
भातुकलीचा खेळ ।

त्यातला मी राजा
आणि ती राणी ।
सांगायची रोज
एक नवीन कहाणी ।

खूप मजा यायची 
धमाल ही व्हायची ।
रागाऊन मग ती
निघून जायची ।

भातुकलीचा खेळ
अजूनही चालतो ।
राग आला तरी
तासाभरात बोलतो ।
Sanjay R.

Sunday, May 31, 2020

" चालायचा दंगा कधी पंगा "

दिवस गेला एक एक
सरलेत किती वर्ष ।
होतो मी लहान जेव्हा
मोठे व्हायचे आकर्षण ।

वाटायचं होऊ दे मोठं
जगील मी मनसोक्त ।
रागवणार नाहीत कोणी
करील वाटेल ते मस्त ।

मोठा झालो सारंच जगलो

आठवतो मी जुने दिवस ।
वाटतं हवेत परत तेच
बालपणाचे दिवस सरस ।

हसणं ते रडणं ते दूर झालं
हरवली ती मजा मस्ती ।
मिळणार नाही परत कधीच
चालायची जी कट्टी दोस्ती ।

खेळ दंगा व्हायचा पंगा
रोज असायचा नवा दिवस ।
सारंच सम्पलं, घरात आता
हरवलं बालपण, मन नर्व्हस ।
Sanjay R.



Saturday, May 30, 2020

" जन्माची गाठ "

साक्षीने अग्नीच्या सखे
झालो एक घेऊन फेरे सात ।

योगाचा हा खेळ सारा
तुझ्या माझ्या जन्माची गाठ ।

झाला संसार सुखाचा 
जीवनाला लाभली तुझी साथ ।

सुख आली दुःख आली
त्यात होती आनंदाची बरसात ।

सुटुच नये वाटतं मजला
सात जन्म हातातला हात ।
Sanjay R.